“खर्रा उद्योग” फुलला; विक्रेतेही कलाकार, खाणारेही फवारा स्पेशालिस्ट!
विशेष वार्ता, चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
गावागावात सध्या “खर्रा उद्योग” तेजीत असल्याची चर्चा आहे. टपरीवर बसलेले काही विक्रेते इतक्या तन्मयतेने मिक्स घोटतात की जणू ते पाचतारांकित हॉटेलचे शेफच!
कोणी म्हणतो “स्पेशल मसाला!”
कोणी म्हणतो “गुप्त फॉर्म्युला!”
तर काही जण अभिमानाने सांगतात
“आमच्याकडे भद्रावती
स्पेशल, एकदम झकास!”
विक्रेत्यांचा आत्मविश्वास पाहिला तर वाटतं त्यांनी एमबीए नाही तर “एम.के.ए.” मास्टर ऑफ खर्रा आर्ट्स केलंय!
नागरिकांची दोन्ही बाजूंवर खिल्ली
एका तरुणाचं भन्नाट मत
“विक्रेता दिवसभर मेहनत करून खर्रा घोटतो, पण खाणारा रस्त्यावर रंग उधळतो!”
एक आजोबा म्हणाले
“विक्रेत्याला कलाकार
पुरस्कार द्या आणि पिचकारी
मारणाऱ्याला स्वच्छता दूत
बनवा!”
काही जणांनी तर प्रस्ताव मांडला
“खर्रा विक्री करणाऱ्यांनी ‘नो
स्प्रे झोन’ची सूचना द्यावी;
नाहीतर ग्राहकांना हेल्मेट फ्री
द्या!”
रस्त्यावरचा ‘रेड इफेक्ट’..!
दुचाकीस्वार तोंडात खर्रा घेऊन वेगात जातो…
आणि अचानक लाल पिचकारी!
मागचा बिचारा हेल्मेट पुसत म्हणतो
“हा इंडिकेटर आहे की पेंटिंग
प्रोजेक्ट?”
काही बर कार चालकही काही कमी नाहीत.
गाडी मस्त चालवितात, काच खाली उतरवतात, आणि लांबची पिचकारी मारतात!
कार थांबली की गाडीचे गेट चक्क लाल रंगाचे दिसते जणू नवीन डिझाईन केलंय!
गावातील विनोदी निष्कर्ष
गावात आता विनोदाने म्हणतात
“खर्रा विक्रेते ‘मिक्स मास्टर’,
आणि खाणारे ‘फवारा फाइटर!’”
हास्याच्या आड संदेश..!
विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होतेच,
पण रस्त्यावर घाण करणाऱ्यांवरही तितकंच लक्ष हवं.
दोघेही या कथेतले मुख्य पात्र आहेत.
गावातील शेवटचा टोला…
“खर्रा विकणारा स्टॉलवर
बसतो,
पण खर्रा खाणारा रस्त्यावर रंगोत्सव करतो!”


