Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीभद्रावती हद्दीत जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त..!

भद्रावती हद्दीत जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त..!

घोडपेठ चा प्रमोद उर्फ “काली” फरार..!

भद्रावती, (प्रतिनिधी):-

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मौजा मुरसा (ता. भद्रावती) येथील जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही इसम जंगल परिसरात एकत्र येऊन पैशांचा जुगार खेळत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून अचानक धाड टाकली. कारवाईदरम्यान चार जणांना रंगेहात पकडण्यात आले.
प्रसंगी घटनास्थळी ५२ तास पत्ते (कि ,50 रुपये), डावावरील व आरोपींच्या अंगझडतीतील नगदी 29 हजार 400 रूपये, एकूण ६ मोटारसायकली , ३ मोबाईल फोन
असा एकूण 4 लाख 69 हजार 450रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले.
यावेळी अटक करण्यात आलेले आरोपी शुभम रमेश कारेकार (वय 30 वर्षे), रा. किलोणी, विनोद वासुदेव सेलोटे (वय 45 वर्षे), रा. पडोली, संजय पांडुरंग सोनेकर (वय 32 वर्षे), रा. शेणगाव, शुभाष मारोती गानफाडे (वय 40 वर्षे), रा. मुरसा असून फरार आरोपी प्रमोद उर्फ काली, रा. घोडपेठ, ता. भद्रावती, दादु बोबडे, रा. शेणगाव (घुग्घूस) असून इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप. क्र. 385/26, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई PSI सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली Hc संतोष येलपूलवार, नितिन रायपूरे, नितिन साळवे, नितिन कुरेकार, सचिन गुरुनुले, जय सिंग, प्रमोद कोटनाके, प्रसाद दुडगधे आदींच्या पथकाने पार पाडली.
पोलीस प्रशासनाने जुगार व इतर बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला असून फरार आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!