Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीकाटवल ची माहिती प्रसारमाध्यमांतून माहिती.. निवेदनं दिली… ‘पण्या’चा धंदा मात्र जोरात! ग्रामस्थ..

काटवल ची माहिती प्रसारमाध्यमांतून माहिती.. निवेदनं दिली… ‘पण्या’चा धंदा मात्र जोरात! ग्रामस्थ..

एकावर कारवाई, दुसरा तयार; ‘पण्या’चा तालुकाभर सपाटा..!
दारूच्या पेट्या गावोगावी…!

भद्रावती,न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यात काटवल चा “पण्या” अवैध विनापरवाना देशी दारूचा खेळ इतक्या बिनधास्तपणे सुरू उखड पणे करीत आहे की, आता तो “उघड गुपित” बनला आहे. ‘पण्या’ नावाचा युवक गावोगावी फिरून दारूच्या पेट्या वाटत असल्याची चर्चा असून, ग्रामस्थ मणतात “हा येतो, पेट्या उतरवतो आणि निघून जातो… जणू काही होम डिलिव्हरीच!”

माहितीनुसार, ‘पण्या’ हा काटवल चा आहेत, रोज नवं गाव पकडतो. पेट्या उतरतात, माल संपतो, आणि पुढचं गाव तयार! एवढं सगळं सुरू असताना कायद्याचा धाक कुठे आहे, हा प्रश्न आता लोक उघडपणे विचारू लागले आहेत. “संबंधित प्रशासन येईपर्यंत माल जातो, आणि माल येईपर्यंत संबंधित प्रशासन दिसत नाही,” अशी गावात जोरदार चर्चा रंगतेय.

काही दिवसांपूर्वी वरोरा येथील आशिष नावाच्या युवकावर बनावट दारू प्रकरणात कारवाई झाली होती. पण त्याचा परिणाम काय?
लोकांच्या भाषेत, “एकावर कारवाई, दुसरा रेडी!” म्हणजे खेळ थांबण्याऐवजी अजूनच जोरात सुरू आहे.

विशेष म्हणजे, ‘पण्या’ काटवल..च्या या धंद्याबाबत आधीही प्रसारमाध्यमांतून माहिती संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली होती. मात्र, थोडीफार कारवाई झाली म्हणे… पण परिणाम मात्र शून्यच! उलट “कारवाई फक्त कागदावरच?” असा थेट सवाल आता नागरिक करत आहेत.

संबंधित प्रशासनानं विशेष मोहीम राबवली का?
याचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे लोकांचा रोखठोक सवाल
“प्रसारमाध्यमांतून पण्या काटवल ही माहिती दिली, निवेदनं दिली… पण कारवाई कुठे? की सगळं ‘सेट’ आहे?”

लोकप्रतिनिधींपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांकडे धाव घेतली, अर्ज दिले… पण प्रत्यक्षात काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.

दरम्यान, गावकऱ्यांचा थेट इशारा
“दारूच्या पेट्या गावात येणं बंद करा, नाहीतर आम्हीच ‘कारवाई मोहीम’ काढू!”

या प्रकरणाचा पुढील भाग, अधिक धक्कादायक माहिती, कोणाचे नाव समोर येणार आणि या संपूर्ण जाळ्याचा खरा चेहरा उघड होणार… लवकरच!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!