Monday, April 20, 2026
Homeचंद्रपूरघरातून गेले… पण परतले नाहीत; सुधाकर भोयर यांचा शोध

घरातून गेले… पण परतले नाहीत; सुधाकर भोयर यांचा शोध

घरातून गेले… पण परतले नाहीत; सुधाकर भोयर यांचा शोध

फोनवर शेवटचे शब्द “मी ट्रेनमध्ये आहे”; त्यानंतर काहीच नाही

चंद्रपूर (लखमापूर) प्रतिनिधी :-
लखमापूर येथील रहिवासी सुधाकर मोतीराम भोयर (वय 63 वर्षे) हे हरवले असून त्यांच्या शोधासाठी कुटुंबीयांनी नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले आहे.

माहितीनुसार, दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 5:30 ते 6:00 दरम्यान ते घरातून निघून गेले. त्याच दिवशी दुपारी 2:27 वाजता फोन करून “मी भोपालला ट्रेनमध्ये आहे” अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.

सदर व्यक्तीचा रंग सावळा असून मांडीवर पांढरे चट्टे आहेत. उंची सुमारे 5 फूट 3 इंच आहे. अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट (निळ्या व पिवळ्या लाईन्ससह) व गडद निळी पॅन्ट आहे. हातात लाल धागा, गळ्यात तुळशीची माळ असून सोबत sky blue रंगाची बॅग व पांढरा दुपट्टा आहे.

सुधाकर भोयर हे मानसिक आजाराने त्रस्त असून त्यांच्या जवळ सध्या मोबाईल किंवा कोणतेही ओळखपत्र नाही. त्यामुळे त्यांचा शोध तातडीने लागणे आवश्यक आहे.

कोणालाही सदर व्यक्ती दिसल्यास किंवा कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

संपर्क: 9529323795

नागरिकांनी ही माहिती पुढे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!