Wednesday, July 29, 2026
Homeभद्रावतीजंगलात उघडला ‘मोहा उद्योग’; दुर्गापूर पोलिसांची धडक कारवाई

जंगलात उघडला ‘मोहा उद्योग’; दुर्गापूर पोलिसांची धडक कारवाई

नाल्यालगत सुरू होता गावठी दारूचा मिनी कारखाना; १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

“शेतात पीक कमी… पण ड्रम मात्र फुल्ल!” वरवटच्या जंगलात हातभट्टीचा भन्नाट अड्डा उद्ध्वस्त

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा वरवट येथील शेतशिवारातील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वरवट येथील जंगली नाल्यालगत हातभट्टी लावून मोहा फुलापासून गावठी दारू तयार केली जात होती. “जंगल सफारीला गेल्यावर वाघ दिसेल की दारूचा ड्रम?” अशी उपरोधिक चर्चा परिसरात सुरू असतानाच दुर्गापूर पोलिसांनी दि. ९ मे रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजताच्या दरम्यान घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल १३ प्लास्टिक ड्रममध्ये भरलेला ६५० किलो मोहफुलाचा सडवा, ४९ लिटर तयार गावठी दारू, ५ लोखंडी ड्रम, १३ प्लास्टिक ड्रम, प्लास्टिक कॅन, टिनाचे पिपे, लाकडी चाटू व प्लास्टिक पाईप असा एकूण १ लाख १५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला….

विशेष म्हणजे, जंगलात एवढ्या “व्यवस्थित नियोजनाने” सुरू असलेला हा दारू उद्योग पाहून काही नागरिकांनी “हे हातभट्टी केंद्र होतं की ग्रामीण औद्योगिक प्रकल्प?” असा टोला लगावला.

या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात अप क्र. 260/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ब), (क), (इ), (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक चंद्रपूर आयुष निपोनी, परी.  पोलीस अधीक्षक कायंदे पाटील दुर्गापूर यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात पो. उपनिरीक्षक पंकज वासाडे, पोउपनिरीक्षक बिंकालवार, मपो हवा राणी, पो. अ. संदीप, पो. अ. मंगेश शेंडे, पो. अ. रुपेश सावे यांनी केली…

दरम्यान, जंगल परिसरात लपूनछपून सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, “दारूबंदी कायदा फक्त पुस्तकात नाही, जंगलातही पोहोचला,” अशी मिश्किल प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे….

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!