Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूरभद्रावतीत अवैध गुडबां दारूविरोधात उत्पादन शुल्क विभाग वरोरा ॲक्शन मोडमध्ये

भद्रावतीत अवैध गुडबां दारूविरोधात उत्पादन शुल्क विभाग वरोरा ॲक्शन मोडमध्ये

पिंपरी-चिंचवड विषारी दारू दुर्घटनेनंतर हालचाली वेगात; तांडा गाव  एक्यश मोड परिसरात तपासणी, विक्रेत्यांना कडक ताकीद

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात मिथेनॉलमिश्रित दारूचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे.

या पार्श्वभूमीवर भद्रावती परिसरातही अवैध गुडबां दारूविरोधात उत्पादन शुल्क विभाग वरोरा सतर्क झाल्याची माहिती समोर येत आहे. भंगाराम वार्डासह काही भागांमध्ये कथित अवैध दारू विक्रीबाबत तक्रारी वाढत असतानाच विभागाने हालचाली सुरू केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

विशेषतः तांडा एक्यश मोड परिसरात उत्पादन शुल्क विभागाने तपासणी मोहीम राबविल्याची माहिती मिळत असून बरांज तांडा परिसरातील काही कथित गुडबां विक्रेत्यांना कडक ताकीद देण्यात आल्याचे समजते. विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत अवैध दारू विक्रीवर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड दुर्घटनेत मिथेनॉलमिश्रित दारूमुळे अनेकांचे जीव गेल्यानंतर भद्रावतीतील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “अवैध दारूमुळे निष्पापांचे जीव जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने वेळेत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, भंगाराम वार्ड परिसरात स्वस्तात मिळणाऱ्या कथित गुडबां दारूमुळे युवक व्यसनाधीन होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महिलांनीही रात्री मद्यपींचा त्रास वाढत असल्याची नाराजी व्यक्त करत अवैध अड्ड्यांवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली आहे.

उत्पादन शुल्क विभाग वरोरा यांच्या वाढत्या हालचालींमुळे कथित अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून “पिंपरी-चिंचवडसारखी दुर्घटना भद्रावतीत घडू नये,” यासाठी कठोर कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!