Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूरशेगाव येथील कथित अवैध दारूविक्रीबाबत नागरिकांनी प्रशासनाचे वेधले लक्ष

शेगाव येथील कथित अवैध दारूविक्रीबाबत नागरिकांनी प्रशासनाचे वेधले लक्ष

आगरा गावात अवैध दारूविक्रीचा आरोप; कारवाईची नागरिकांची मागणी..!

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

वरोरा तालुक्यातील आगरा गाव (शेगाव पोलीस स्टेशन हद्द) येथे मारोती निखाडे नामक व्यक्तीकडून अवैधरित्या विना परवाना दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असून युवक वर्गावर त्याचा दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत संबंधित प्रशासनाने चौकशी करून नियमबाह्य प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी एका जागरूक नागरिकाने केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, संबंधित विभागाच्या चौकशी अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या वृत्तातील बाबी या नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी व आरोपांवर आधारित आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!