Saturday, June 13, 2026
Homeभद्रावतीपिपरी घाटावर पहाटेची विनापरवाना रेती चोरावर कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..

पिपरी घाटावर पहाटेची विनापरवाना रेती चोरावर कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..

विनापरवाना रेती भरताच! नांदे,  मोहन ठाकरे यांच्या ट्रॅक्टरची पिपरी घाटात  भद्रावतीती पोलिसांकडून कारवाई. 

घमेली चालली होती.. रेतीकडे, पण पोलिसांची गाडी पोहोचली थेट घाटाकडे; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा…

भद्रावती  न्यूज डेस्क ✍️

वर्धा नदीच्या पात्रात पहाटेची शांतता होती. रेती आपल्या जागेवर निवांत पडली होती. मात्र काही जणांनी तिला ट्रॅक्टर ट्रॉलीत बसवून “नव्या मुक्कामाला” पाठविण्याची तयारी सुरू केली होती. फावडे, घमेले आणि ट्रॅक्टरच्या साथीने रेतीचे स्थलांतर सुरू असतानाच भद्रावती पोलिसांची एन्ट्री झाली आणि संपूर्ण खेळ खल्लास केल….

पिपरी नदीघाट परिसरात विना परवाना रेती उपसा सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने API संजय मिश्रा, पोलीस शिपाई प्रेमकुमार बावणकर, योगेश घुगे व चालक अशोक मिस्त्री यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पंच राहुल शंकर मिटपल्लीवार आणि दिलीप पिसु मिटपल्लीवार यांच्या उपस्थितीत नदीघाटावर छापा टाकण्यात आला.

घाटावर पोहोचताच दोन ट्रॅक्टर नदीपात्रातून ट्रॉलीमध्ये रेती भरताना आढळून आले. पोलिसांना पाहताच संबंधितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे रंजीत शंकर आत्राम (रा. चिरादेवी) आणि आदर्श सुभाष मिटपल्लीवार (रा. गवराळा) अशी सांगितली.

“परवाना कुठे आहे?” असा प्रश्न पोलिसांनी विचारताच उत्तर मात्र रिकाम्या ट्रॉलीसारखेच निघाले. रेती उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे त्यांनी मान्य केले. पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४-बीव्ही-०३६९ व ट्रॉली क्रमांक एमएच-३४-सीजे-७२७७ मध्ये सुमारे ९० ते १०० घमेले रेती आढळून आली. तर ट्रॅक्टर क्रमांक एमएच-४०-एल-५८१६ च्या ट्रॉलीमध्ये ३ ते ४ घमेले रेती आढळली.

कारवाईदरम्यान दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली आणि रेती असा एकूण १० लाख ६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये एका ट्रॅक्टरची किंमत ५ लाख रुपये, ट्रॉलीची किंमत १ लाख रुपये आणि रेतीची किंमत ६ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर दुसऱ्या ट्रॅक्टरची किंमत ३ लाख रुपये, ट्रॉलीची किंमत १ लाख रुपये आणि रेतीची किंमत २४० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चौकशीत आदर्श मिटपल्लीवार याने संबंधित ट्रॅक्टर व ट्रॉली हे संदीप आनंदराव नांदे (रा. पिपरी) यांचे असल्याचे सांगितले. तर रंजीत आत्राम याने दुसरे वाहन मोहन हनुमान ठाकरे (रा. झाडे प्लॉट, भद्रावती) यांचे असल्याची माहिती दिली. दोघांनाही नदीघाटावर रेती भरण्यास संबंधित मालकांनीच पाठविल्याचेही चौकशीत समोर आले.

या प्रकरणी रंजीत शंकर आत्राम, आदर्श सुभाष मिटपल्लीवार, संदीप आनंदराव नांदे आणि मोहन हनुमान ठाकरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४७(७) व ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपोणे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकाल यांच्या नेतृत्वात व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात पार पडली. कारवाईत API संजय मिश्रा, विजय उपरे, पोलीस शिपाई प्रेमकुमार बावणकर, पोलीस शिपाई योगेश घुगे आणि चालक पोलीस शिपाई अशोक मिस्त्री यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वर्धा नदी पात्रातील अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!