Saturday, July 4, 2026
HomeUncategorizedबगडेवाडीत पुन्हा बिबट्याचा वावर; "जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?" इम्रान खान

बगडेवाडीत पुन्हा बिबट्याचा वावर; “जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?” इम्रान खान

तीन दिवसांपासून भद्रावतीत बिबट्याची दहशत; वनविभागाचा फक्त ‘फटाका शो’? नागरिकांचा संताप!

बगडेवाडीत पुन्हा बिबट्याचा वावर; इम्रान खान यांचा सवाल “जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?”

भद्रावती , न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare , 95 52 61 25 55

भद्रावती शहरात सलग तीन दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. बिबट्या विविध भागांत दिसल्याच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. लहान मुले, महिला आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष भीतीचे वातावरण आहे.

या गंभीर परिस्थितीत वनविभागाच्या कारवाईवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी यापूर्वीच वनविभागाला बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, बगडेवाडी परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच इम्रान खान, भाजयुमो शहर महामंत्री मोनू पारधे आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाला वारंवार संपर्क करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले, काही फटाके फोडले आणि त्यानंतर ते परत गेले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गवराळा परिसरात एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना होणार की केवळ औपचारिक कारवाई सुरू राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इम्रान खान यांनी इशारा देत म्हटले की, “उद्या बिबट्याच्या हल्ल्यात कोणाची जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.

सध्या भद्रावतीतील नागरिकांची एकच मागणी आहेबिबट्याचा तातडीने सुरक्षित बंदोबस्त करा आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करा.


पुढील भागात…

वनविभागाच्या कारवाईचा प्रत्यक्ष आढावा

घटनास्थळी नेमके काय घडले?

नागरिकांचे संतप्त अनुभव

बिबट्याचा बंदोबस्त की पुन्हा आश्वासनांची आतषबाजी?

प्रशासनाला नागरिकांचे रोखठोक प्रश्न

वाचा लवकरच… फक्त रोखठोक ऑनलाइन न्यूजवर!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!