Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीसट्ट्याच्या आकड्यांना पोलिसांचा ‘जोरदार झटका’; पोलिस अधीकारी  सचिन खेत्रेंच्या दणक्याने सट्टेबाजांचे गणितच...

सट्ट्याच्या आकड्यांना पोलिसांचा ‘जोरदार झटका’; पोलिस अधीकारी  सचिन खेत्रेंच्या दणक्याने सट्टेबाजांचे गणितच फिस्कटले!

सट्ट्याच्या आकड्यांना पोलिसांचा ‘जोरदार झटका’; पोलीस अधीकारी सचिन खेत्रेंच्या दणक्याने सट्टेबाजांचे गणितच फिस्कटले!

‘आकडा’ लावण्याआधीच पोलिसांची एंट्री; ठानेदार योगेश्वर पारधींच्या मार्गदर्शनाखाली पथकाची धडाकेबाज कारवाई

भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे 

भद्रावतीत सट्ट्याच्या आकड्यांवर डोळे लावून बसलेल्या ‘गणितज्ञां’ना पोलिसांनी असा धक्का दिला की, त्यांचे जोड, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार सगळेच एकाच वेळी चुकले! सट्ट्याच्या दुनियेत ‘आज कोणता आकडा येणार?’ याची चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी धडक दिल्याने सट्टेबाजांचा ‘लकी नंबर’ थेट पोलिस कारवाईत बदलला.

परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात आणि ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सट्टेबाजांविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांची ही कारवाई पाहून ‘आकड्यांचा बाजार’ मांडणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

या कारवाईत PSI संतोष केदार, PSI गजानन तुपकर, योगेश घाटोडे, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर,  संतोष राठोड,  खुशाल कावळे आणि देवानंद डुकरे यांच्यासह पोलिस पथक सहभागी झाले.

सट्टेबाज दिवसभर आकड्यांचे भविष्य सांगत होते; मात्र पोलिस आल्यावर स्वतःचे पुढचे काही मिनिटांचे भविष्यही त्यांना सांगता आले नाही! ‘नफा किती?’ याचे गणित मांडणाऱ्यांना आता ‘कारवाई किती?’ याचा हिशोब करावा लागल्याची चर्चा आहे.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सट्टा-जुगाराच्या अवैध धंद्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सट्ट्याच्या ‘बाजारातील’ अनेकांचे कॅल्क्युलेटर सध्या शांत असून, आकड्यांपेक्षा पोलिसांचा कारवाईच  भारी ठरल्याची चर्चा भद्रावतीत रंगली आहे!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!