Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीखर्रा विक्रीला पोलिसांचा लगाम; टपऱ्यांच्या प्रश्नावर नगर परिषद प्रशासन मौनात?

खर्रा विक्रीला पोलिसांचा लगाम; टपऱ्यांच्या प्रश्नावर नगर परिषद प्रशासन मौनात?

खर्रा विक्रीवर पोलिसांचा दणका; आता टपऱ्यांवर नगर परिषद प्रशासनाची कारवाई कधी?

भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे

भद्रावती शहरात खर्रा विक्रीविरोधात परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांनी कारवाईचा दणका दिल्यानंतर अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, खर्रा विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या टपऱ्या तसेच अनधिकृत स्वरूपातील व्यवसायांबाबत आता नगर परिषद प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पोलिस प्रशासनाने खर्रा विक्रीविरोधात कारवाई केली असली तरी शहरातील अनधिकृत टपऱ्या हटविणे, अतिक्रमणाची पाहणी करणे आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्यवसायांवर नगर परिषद प्रशासनाने आपल्या अधिकारानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर काही ठिकाणी खर्रा विक्री लपूनछपून सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ विक्रेत्यांवर कारवाई न करता अशा विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनधिकृत ठिकाणांवरही संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांनी खर्रा विक्रीविरोधात सुरुवात करून दिली आहे. आता ‘पोलिसांचा दणका झाला, नगर परिषदेचा हातोडा कधी?’ असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासोबतच नियमबाह्य टपऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाने पार पाडावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

पुढील भागात आणखी माहिती…

भद्रावती शहरातील अनधिकृत टपऱ्या, त्यांच्यावर नगर परिषद प्रशासनाची संभाव्य कारवाई आणि खर्रा विक्रीविरोधातील पुढील घडामोडींबाबत अधिक माहिती पुढील भागात…

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!