Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीपोलीस उपअधीक्षक खेत्रे साहेबांचा दणका भारी! दारूवाल्यांची बोलेरो थेट पोलिसांच्या ताब्यात

पोलीस उपअधीक्षक खेत्रे साहेबांचा दणका भारी! दारूवाल्यांची बोलेरो थेट पोलिसांच्या ताब्यात

खेत्रे साहेबांचा दणका! दुधानीची बोलेरो पकडली; निर्बान वाईन शॉपचा ‘दारूचा खेळ’ उघड

भद्रावती पोलिसांची धडक कारवाई; विदेशी दारूसह ७ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती,  न्यूज डेस्क ✍️
अवैध दारूच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी भद्रावती पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध दारू वाहतूक करणारी महिंद्रा NEO BOLERO पकडली. पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत विदेशी दारूसह तब्बल ७ लाख ८५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चंदनखेडा बीट परिसरातील खोकरी फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी MH 34 CJ 3175 क्रमांकाची बोलेरो संशयास्पदरीत्या जाताना दिसताच पोलिसांनी ती अडवून झडती घेतली. गाडी उघडताच आत विदेशी दारूचा साठा आढळून आला.

दारासिंग सांगतसिंग दुधानी (वय ३१, रा. राजीव गांधी वॉर्ड, वरोरा) याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. वाहनातून सह्याद्री गोल्ड व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, कार्लसबर्ग बिअर, हायवर्ड ५००० बिअर आणि टुबर्ग बिअरचा साठा जप्त करण्यात आला.

दारूसाठ्याची किंमत ३५ हजार ४० रुपये, तर वाहनाची किंमत ७ लाख ५० हजार रुपये आहे.

पोलिस उपअधीक्षक खेत्रे साहेबांच्या ‘ॲक्शन मोड’समोर दारूचा डाव फेल!

दारूचा माल मुक्कामावर पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच खेत्रे साहेबांच्या पोलिसांनी खोकरी फाट्यावरच ‘ब्रेक’ लावला. बोलेरो निघाली होती दारू घेऊन; पण शेवटी तिचा प्रवास थेट पोलीस ठाण्यातच संपला!

या प्रकरणी निर्बान वाईन शॉपचे मालक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या दारू वाहतुकीच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. प्रशांत शेंदरे, पो.उप.नि. संतोष केदार, पो.हवा. देवानंद डुकरे, पो.हवा. गोपाल आतकुलवार, पो.ह. अनुप आस्टूनकर, पो.अं. खुशाल कावडे, योगेश घाटोळे, पो.अं. संतोष राठोड आणि महिला पोअं. प्रियदर्शनी बेरड यांच्या पथकाने केली.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

‘दारूवाल्यांचा प्लॅन होता भारी; पण खेत्रे साहेबांचा प्लॅन त्याहून भारी!’

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!