Tuesday, October 27, 2026
Homeभद्रावतीराजुरा ते चिमूर २६ सप्टेंबर, भद्रावती-ब्रह्मपुरी २७ सप्टेंबर; मद्यविक्री बंद

राजुरा ते चिमूर २६ सप्टेंबर, भद्रावती-ब्रह्मपुरी २७ सप्टेंबर; मद्यविक्री बंद

गणेश विसर्जनाला मद्यविक्रीला ‘ब्रेक’!

राजुरा, मूल, वरोरा, चिमूरमध्ये २६ सप्टेंबर; भद्रावती-ब्रह्मपुरीत २७ सप्टेंबरला संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद

चंद्रपूर , न्यूज डेस्क

गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने थेट मद्यविक्रीवर निर्बंध आणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर परिषद क्षेत्रांत संबंधित विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत.

राजुरा, मूल, वरोरा आणि चिमूर येथे २६ सप्टेंबर, तर भद्रावती आणि ब्रह्मपुरी येथे २७ सप्टेंबर रोजी हा आदेश लागू राहणार आहे.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणात निघणार असल्याने गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

कुठे-कधी बंद?

२६ सप्टेंबर : राजुरा, मूल, वरोरा आणि चिमूर नगर परिषद हद्द
२७ सप्टेंबर : भद्रावती आणि ब्रह्मपुरी नगर परिषद हद्द

या कालावधीत एफएल-२, सीएल/एफएल/टीओडी-३, एफएलबीआर-२, एफएल-३ आणि सीएल-३ या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्यांची दुकाने संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत.

प्रशासनाचा आदेश असल्याने संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

गणेश विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे विसर्जनाच्या दिवशी मद्यविक्रीला मात्र चांगलाच ‘ब्रेक’ लागणार आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!