Tuesday, October 27, 2026
Homeभद्रावतीगणरायाच्या निरोपासाठी भद्रावती सज्ज; नगरपरिषद ‘ऑन ड्युटी’!

गणरायाच्या निरोपासाठी भद्रावती सज्ज; नगरपरिषद ‘ऑन ड्युटी’!

गणरायाच्या निरोपासाठी भद्रावती ‘फुल्ल ॲक्शन’ मोड मध्ये!

खड्डे म्हणाले ‘बाय-बाय’; फांद्या छाटल्या, अतिक्रमण हटविले!

घाटावर रोषणाई, रस्ते मोकळे अन् प्रत्येक गणेश मंडळाचे होणार खास स्वागत!

भद्रावती, न्यूज डेस्क , शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

गणरायाच्या विसर्जनाची तारीख जवळ येताच भद्रावती नगरपरिषदही कामाला लागली आहे. नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या टीमने विसर्जन मार्गापासून थेट विसर्जन घाटापर्यंत तयारीचा धडाका लावला आहे.

रस्त्यातील अडथळ्यांना ‘रामराम’!

गणेश विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील मोठमोठ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. नागरिकांच्या सहकार्याने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणेही हटविण्यात आली.

खड्ड्यांनाही मिळाला ‘निरोप’! 

मुख्य रस्त्यांवर दिसणाऱ्या खड्ड्यांवर डागडुजी करून आवश्यक ठिकाणी डांबरीकरणाची कामे करण्यात आली. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग अधिक सुकर करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला आहे.

घाटावर आता अंधार नाही!

गवराळा येथील गणेश मंदिराच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करून परिसराला आकर्षक स्वरूप देण्यात आले. तसेच विसर्जन घाटात आवश्यक बदल करून घाटावर प्रकाशव्यवस्थाही करण्यात आली आहे.

प्रत्येक गणेश मंडळाचे खास स्वागत पण!

यंदा नगरपरिषदेच्या वतीने प्रत्येक गणेश मंडळाचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे.

थोडक्यात…

खड्डे …. डागडुजी!

फांद्या … छाटल्या!

अतिक्रमण .. हटविले!

रस्ते … मोकळे!

घाट … उजळला!

गणेश मंडळे … स्वागतासाठी सज्ज!

आता गणरायाला निरोप देण्यासाठी भद्रावती नगरपरिषद  सज्ज!

“गणराया, तुम्ही फक्त या… बाकीची व्यवस्था नगरपरिषद पाहते!” 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!