Wednesday, October 28, 2026
Homeभद्रावतीगवराळा गणेश मंदिराचा भव्य गेट रोषणाईने पपहिल्यांदाच गणरायाच्या विसर्जनासाठी परिसर सज्ज

गवराळा गणेश मंदिराचा भव्य गेट रोषणाईने पपहिल्यांदाच गणरायाच्या विसर्जनासाठी परिसर सज्ज

गवराळा गणेश मंदिराचा भव्य प्रवेशद्वार रोषणाईने झगमगणार; गणरायाच्या विसर्जनासाठी परिसर सज्ज

गवराळा तलावात होणार गणेशमूर्तींचे विसर्जन; नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी

भद्रावती, न्यूज डेस्क  शंकर बोरघरे,  95 52 61 25 55 

गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भद्रावती नगरपरिषद क्षेत्रातील गवराळा गणेश मंदिराचा भव्य मुख्य प्रवेशद्वार आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगून उठणार असून, संपूर्ण परिसर गणरायाच्या निरोपासाठी सज्ज करण्यात आला आहे. प्रवेशद्वारापासून परिसरातील विविध भागात करण्यात आलेली सजावट विसर्जन सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.

गवराळा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, गणेश मंडळांच्या मिरवणुका याच मार्गाने विसर्जनस्थळी दाखल होणार आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने परिसराची स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि विसर्जनस्थळावरील आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेडकी यांच्या नेतृत्वात आणि नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाकडून विसर्जनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही सज्ज असून, मिरवणूक मार्ग, वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गणेश मंडळे व नागरिकांनी विसर्जन सोहळा उत्साहात साजरा करताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, शिस्त व संयम राखावा आणि सुरक्षित विसर्जनासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!