कचरा रोज, गाडी कधी?
संताजी नगरातील नागरिकांचा इम्रान खान यांना फोन; “कचरा कुठे टाकायचा?”
भद्रावती, न्यूज डेस्क ..शंकर बोरघरे
भद्रावती नगरपरिषद हद्दीतील संताजी नगर परिसरातील नागरिक सध्या कचरा संकलनाच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत नागरिकांकडून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांना एकापाठोपाठ एक फोन येत आहेत.
“इम्रान भाई, आमच्या घरचा कचरा खूप जमा होतोय. कचरा गाडी दोन दिवसांनी येते की चार दिवसांनी, काही कळतच नाही. कचरा रोज तयार होतो, पण गाडी मात्र पाहुण्यासारखी कधीमधी दर्शन देते,” अशी नागरिकांची तक्रार आहे.
दोन दिवस गाडी आली नाही की कचऱ्याची पिशवी मोठी आणि चार दिवस झाले की घरातील कचऱ्याचा ढीग मोठा! आता नागरिकांनाही प्रश्न पडला आहे .कचरा घरात ठेवायचा की नगरपरिषद कार्यालयाचा पत्ता शोधायचा?
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कचरा संकलनाची व्यवस्था नियमित झाली नाही तर पुढे कचरा कुठे टाकला जाईल याची गॅरंटी देता येणार नाही. समस्या तातडीने सोडवली नाही तर नागरिक आंदोलनाच्या भूमिकेत जाण्याचा इशारा देत आहेत.


