Wednesday, October 28, 2026
Homeभद्रावतीघरात तीन तलवारी, सोबत खंजर; भद्रावती पोलिसांनी ‘संग्रह’ केला जप्त

घरात तीन तलवारी, सोबत खंजर; भद्रावती पोलिसांनी ‘संग्रह’ केला जप्त

घरात तीन तलवारी अन् खंजर; भद्रावती पोलिसांची धडक कारवाई

गोपनीय माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाची घरावर झडती; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती, न्यूज डेस्क

शंकर बोरघरे 95 52 61 25 55 

घरात संसारोपयोगी वस्तू असतात; मात्र खापरी वॉर्ड क्रमांक ३ मधील एका घरात चक्क तीन तलवारी आणि एक खंजर आढळून आल्याने परिसरात चर्चा रंगली. पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळताच भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत चारही शस्त्रे जप्त केली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी गोविंदा मारोती बावणे (वय २६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. खापरी वॉर्ड क्र. ३, भद्रावती) याच्या घरी धारदार व घातक शस्त्रे बेकायदेशीररीत्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने पंचांच्या मदतीने संबंधित घराची झडती घेतली.

झडतीदरम्यान पोलिसांना तीन जुन्या तलवारी आणि एक खंजर आढळून आले. एकामागून एक शस्त्रे सापडल्याने घरात नेमका कसला ‘संग्रह’ ठेवण्यात आला होता, अशी चर्चा सुरू झाली. पोलिसांनी चारही शस्त्रे ताब्यात घेतली असून जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत १३ हजार रुपये आहे.

प्रसंगी, जप्त केलेल्या पहिल्या तलवारीची पूर्ण लांबी ६२ सेंमी असून अंदाजे किंमत ५ हजार रुपये, दुसऱ्या तलवारीची पूर्ण लांबी ५२ सेंमी असून किंमत ४ हजार रुपये, तर तिसऱ्या तलवारीची पूर्ण लांबी ५६ सेंमी असून किंमत ३ हजार रुपये आहे. तसेच ३४ सेंमी लांबीचा जुना वापरातील खंजर अंदाजे १ हजार रुपये किमतीचा असल्याबद्दल पण माहितीनुसार..

या  प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस अंमलदार खुशाल कावळे, पोलीस स्टेशन भद्रावती यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४६/२०२६, कलम ४ व २५ आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला  असल्याची पण पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली….

पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनात धडक कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी , पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात तसेच प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांचे नेतृत्वात  करण्यात आली.

गोपनीय माहिती मिळताच तिची खातरजमा करून तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचणे आणि घरातून शस्त्रे जप्त करणे, यामुळे पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची तत्परता पुन्हा एकदा दिसून आली. पोलिसांच्या नजरेतून शस्त्रसाठा लपून राहत नाही, हे या कारवाईतून स्पष्ट झाले.

या कारवाईत पोउपनि. संतोष केदार, पोहवा. गोपाल आतकुलवार, देवानंद डुकरे, अनुप आष्टुनकर, प्रशांत शेंदरे, पोअं. योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड तसेच मपोअं. मोनाली गारघाटे यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, जप्त करण्यात आलेली शस्त्रे नेमकी कशासाठी आणि कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आली होती, याचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!