Wednesday, November 4, 2026
Homeभद्रावतीपानठेला, किराणा अन् हॉटेलमध्ये दारूचा खेळ! खेत्रे साहेबांचा दणका; चार आरोपी गजाआड

पानठेला, किराणा अन् हॉटेलमध्ये दारूचा खेळ! खेत्रे साहेबांचा दणका; चार आरोपी गजाआड

घोडपेठतञपोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! चंदनखेड्यातही धाड; चार आरोपी गजाआड!

 एकाच वेळी धाडी; चार विक्रेत्यांना अटक, १७ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती, न्यूज डेस्क

शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

ग्रामीण भागात देशी दारूचा अवैध धंदा करणाऱ्यांनी जरा सावध व्हा! कारण भद्रावती पोलिसांच्या मैदानात आता कारवाईचा सामना सुरू झाला आहे. कुठे पानठेला, कुठे किराणा दुकान तर कुठे हॉटेल… दारू विक्रीचा अड्डा कुठेही असो, पोलिसांची नजर आता तिथपर्यंत पोहोचत आहे!

३० ऑक्टोबर रोजी घोडपेठ येथील तीन ठिकाणी आणि चंदनखेडा येथे पोलिसांनी धाडसत्र राबवून चार आरोपींना अटक केली. या कारवाईत तब्बल १७ हजार ७२० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या संपूर्ण कारवाईच्या मागे पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. अवैध दारू विक्रेत्यांनी दुकानाचे नाव काहीही ठेवावे, पण पोलिसांच्या कारवाईपासून सुटका नाही, असा संदेशच या धडक कारवाईतून मिळाला आहे.

घोडपेठ येथील सायवन फाट्याजवळ संजय पुरुषोत्तम अलोने याच्या पानठेल्यातून ६५ बाटल्या, बसस्थानक चौकातील रवि बाळकृष्ण मानुसमारे याच्या किराणा दुकानातून १४० बाटल्या, तर हॉटेलचालक चमकौरसिंग धारीवाल याच्या हॉटेलमधून ३८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

दुसरीकडे चंदनखेडा येथे गौरव शाहू याच्याविरुद्ध कारवाई करून आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, देवानंद डुकरे, अनुप आस्टुनकर, गोपाल आतकुलवार तसेच पोलीस अंमलदार खुशाल, संतोष राठोड आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली गारघाटे यांनी केली

सचिन खेत्रे साहेबांचा स्पष्ट संदेश!

अवैध दारू विक्रीचा धंदा छोटा असो वा मोठा, कारवाईपासून कोणालाही सूट नाही. घोडपेठ ते चंदनखेडा या धाडसत्राने अवैध विक्रेत्यांच्या गोटात नक्कीच धडकी भरवली आहे. आता ग्रामीण भागातील इतर अवैध दारू विक्रेत्यांची पाळी कधी, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!