Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीराज्य पत्रकार संघाच्या भद्रावती शाखाध्यक्षपदी संतोष उर्फ पवन शिवणकर यांची नियुक्ती

राज्य पत्रकार संघाच्या भद्रावती शाखाध्यक्षपदी संतोष उर्फ पवन शिवणकर यांची नियुक्ती

इम्रान खान यांच्याकडून अभिनंदन

भद्रावती (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूरच्या वतीने संतोष उर्फ पवन शिवणकर यांची भद्रावती शाखा अध्यक्ष (तालुका अध्यक्ष) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पत्रकारितेतील त्यांचे प्रदीर्घ कार्य, संघटनात्मक बांधिलकी तसेच समाजाभिमुख व लोकहिताची भूमिका याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे भद्रावती तालुक्यात पत्रकार संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या नियुक्तीबद्दल भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांनी संतोष उर्फ पवन शिवणकर यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रश्न मांडताना पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीपत्र स्वीकारताना संतोष उर्फ पवन शिवणकर यांनी संघटनेचे आभार मानत, पत्रकारांच्या हक्कांसाठी, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आणि सत्याच्या बाजूने ठाम भूमिका घेण्याची ग्वाही दिली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!