सर्विस रोड प्रकरणात नेमके कोणते.. प्रशासन.जबाबदार..! इम्रान खान .
भद्रावती (प्रतिनिधी), चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरातील टप्पा चौक परिसरातील सर्विस रोड ही आजकाल नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. येथे अनधिकृत मालवाहू वाहने आणि जड वाहनांची रांग लागल्याने रस्ता पूर्णपणे अडला असून, पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतरही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रत्यक्ष पाहणी: रस्त्याची भीषण स्थिती…!
प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये सर्विस रोडवर ट्रक, पिकअप आणि इतर जड वाहने दोन्ही बाजूंना उभी असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी वाहनांची रांग इतकी लांबली आहे की रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून वाहनांमधून फारशी जागा शोधत मार्ग काढावा लागत आहे.
हा परिसर टप्पा चौकाजवळील व्यस्त भाग असल्याने दिवसा आणि रात्री दोन्हीकाळी समस्या कायम आहे. विशेषतः सकाळी शाळेची वेळ आणि संध्याकाळी बाजारपेठेच्या गर्दीत परिस्थिती अधिक गंभीर बनते.
सुध्न नागरिकांची प्रतिक्रिया…!
स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
एका नागरिकाने सांगितले,
“हा सर्विस रोड लहान
वाहनांसाठी आहे, पण आता
तो ट्रक, मालवाहतूक पार्किंगसाठी वापरला
जातोय. रोजचा त्रास झाला
आहे.”
दुसरे एक दुचाकीस्वार म्हणाले,
समोरून गाडी आली की
थांबून राहावं लागतं. एखादा
अपघात झाला तर जबाबदार
कोण?”
सुध्न नागरिकांची मागणी आहे की तात्काळ अनधिकृत पार्किंग हटवून ‘नो पार्किंग झोन’ घोषित करावा, वाहतूक पोलिसांची नियमित गस्त ठेवावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर करावी.
जबाबदारी नेमकी कोणाची?
नगर परिषद, वाहतूक विभाग की पोलिस प्रशासन या सर्विस रोड पार्किंग संकटाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘नो पार्किंग’ फलकांचा अभाव, नियमित गस्ती नसणे आणि विभागीय समन्वयाचा अभाव यामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे.
जनप्रतिनिधींची भूमिका..!
भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांतून प्रशासनाला आवाहन करत म्हटले की, “नागरिकांच्या सुरक्षिततेला
प्राधान्य देऊन संबंधित
विभागांनी तात्काळ संयुक्त
पाहणी करावी. सर्विस
रोडवरील अनधिकृत पार्किंग
हटवून दंडात्मक कारवाई
करावी आणि कायमस्वरूपी
आराखडा जाहीर करावा.”
त्यांनी इशारा दिला की, वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
या भद्रावती सर्विस रोड प्रकरणात प्रशासनाची नेमकी भूमिका काय राहणार, जबाबदारी निश्चित होणार का आणि कारवाईचा ठोस आराखडा जाहीर होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित विभागांची अधिकृत प्रतिक्रिया , पुढील भागात… (क्रमशः)


