Saturday, July 4, 2026
Homeभद्रावतीप्रभाग क्र. १२ मध्ये बिबट्याची दहशत; वन विभाग जागा होणार कधी?

प्रभाग क्र. १२ मध्ये बिबट्याची दहशत; वन विभाग जागा होणार कधी?

बगडे वाडी, जिल्हा परिषद हायस्कूल व विजासन वार्ड परिसरात पाऊलखुणा; पिंजऱ्याच्या मागणीने नागरिक आक्रमक

भद्रावती , न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बगडे वाडी, जिल्हा परिषद हायस्कूल आणि विजासन वार्ड परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत नगरसेवक अनिल पडोळे यांनी वन विभागाला निवेदन देत परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तसेच वाढलेली झुडपे हटवून परिसर सुरक्षित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

वन विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात शाळा, वस्ती आणि नागरिकांची सततची वर्दळ असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावणे, गस्त वाढविणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

आता वन विभाग किती तत्परतेने कारवाई करतो, याकडे संपूर्ण भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.


✍️ शंकर बोरघरे (Shankar Borghare)
📞 95 25 61 25 55

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!