Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन; १९ जुलैला अकोल्यात...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन; १९ जुलैला अकोल्यात भव्य सोहळा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन; १९ जुलैला अकोल्यात भव्य सोहळा

चंद्रपूर  न्यूज डेस्क ✍️

Shankar Borghare, 95 25 61 25 55

पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी अकोला येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, विशेष चर्चासत्र व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

अकोला येथील हॉटेल कृष्णा इम्पेरियल (नवीन बसस्थानकाजवळ) येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणाऱ्या या एकदिवसीय अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार, संपादक, डिजिटल मीडिया प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी राहणार आहेत. यावेळी न्यायमूर्ती, खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

अधिवेशनातील विशेष आकर्षण असलेल्या चर्चासत्रात “पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकार संरक्षण” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि तज्ज्ञ सखोल मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांची कारणे, पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आणि बदलत्या माध्यमविश्वातील आव्हानांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे.

दुपारी ३ वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून राज्यातील विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना जीवन गौरव, दीपस्तंभ, उत्कृष्ट पत्रकारिता, जिजाऊ पत्रकारिता, आरोग्य पत्रकारिता, युद्धवार्ता पत्रकारिता, तिसरा डोळा पत्रकारिता यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या प्रदेश, विभागीय व जिल्हाध्यक्षांचा गौरव करण्यात येणार असून संघटनेच्या तालुकाध्यक्षांना साहित्य वितरणही करण्यात येणार आहे.

पत्रकारांची सुरक्षा, पत्रकारितेचे स्वातंत्र्य, संघटनात्मक एकजूट आणि समाजाभिमुख पत्रकारितेला बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित या राज्यस्तरीय अधिवेशनास महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे तसेच आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!