पारोधी घाटावर रेती चोरांची पळापळ; महसूल अधिकारी थेट नदीत उतरले!
नदीच्या छातीभर पाण्यात उतरून शुभम धात्रक यांची धाडसी कारवाई; ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा!
भद्रावती , न्यूज डेस्क
शंकर बोरघरे,95 52 61 25 55
रेती चोरांना वाटले असेल, नदीच्या पाण्यात कोण येणार? पण महसूल विभागाच्या शुभम धात्रक यांनी थेट नदीत उतरून त्यांचा अंदाजच चुकवला!
भद्रावती तालुक्यातील मौजा पारोधी घाटावर विनापरवाना रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई केली. ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नदीच्या छातीभर पाण्यातून मार्ग काढत किशोर ढोक यांच्या मालकीचे ट्रॅक्टर पकडले.
त्यानंतर महसूल अधिकारी खुशाल मस्के आणि वाहनचालक बंडू वेलफुलवार घटनास्थळी दाखल झाले. पकडलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
ही कारवाई तहसीलदार पानमंद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
रेती चोरांचा समज होता, नदीचे पाणी आपल्याला वाचवेल; पण महसूल विभागाने पाण्यात उतरूनच गणित बिघडवले!
आता रेती तस्करांनी लक्षात ठेवावे… नदीत पाणी कितीही असो, कायद्याचा हात त्याहून लांब असतो!
रोखठोक |सत्याची धार… निर्भीड वार… जनतेचा आवाज…


