Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीजिल्हाधिकारी विनय गौडा यांचा भद्रावतीत निवडणूक तयारीचा आढावा..!

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा भद्रावतीत निवडणूक तयारीचा आढावा..!

भद्रावती (प्रतिनिधी):-नगरपरिषद निवडणूक २०२५ पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती शहरातील निवडणूक तयारीची पाहणी केली. त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथील Strong Room तसेच मतमोजणी कक्षाची तपासणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. साहित्य वाटप आणि मतमोजणी प्रक्रिया याच ठिकाणी होणार आहे.
यानंतर जिल्हाधिकारी यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील भौतिक परिस्थिती, सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. यामध्ये प्रभाग ११ मधील जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती आणि प्रभाग ७ मधील यशवंतराव शिंदे विद्यालयातील मतदान केंद्रांची पाहणी समाविष्ट होती.
या पाहणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जटाले, तहसीलदार बालाजी कदम, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, पोलिस निरीक्षक योगेश पारधी, नायब तहसीलदार काळे, समीर वाटेकर, राकेश महकुलकर, राजू काळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
याशिवायही नगरपरिषद हद्दीत एकूण ५२५७२ मतदार असून त्यापैकी स्त्री मतदार ,२६५५७ पुरुष मतदार २६०१५आहेत. शहरात ६३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
प्रसंगी निवडणूक तयारीच्या दौऱ्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व खात्याच्या (ASI) अखत्यारीतील विजासन बौद्ध लेणी आणि चंडिका मंदिर या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. ASI अधिकाऱ्यांनी या स्थळांचा इतिहास त्यांना समजावून सांगितला.
तसेच त्यांनी भद्रावतीतील भगवान पार्श्वनाथ मंदिर आणि गौवराळा येथील वरद विनायक गणपती यांचेही दर्शन घेतले.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!