Friday, April 17, 2026
Homeभद्रावती“भद्रावतीत नगर परिषद निवडणूक; मायबाप मतदारराजाचा उत्स्फूर्त सहभाग! इम्रान खान सर्व परिवार...

“भद्रावतीत नगर परिषद निवडणूक; मायबाप मतदारराजाचा उत्स्फूर्त सहभाग! इम्रान खान सर्व परिवार व मित्र परिवारासह म्हणाले ‘मायबाप मतदारराजा माझा खरा आधार!’”

भद्रावती (प्रतिनिधी):-भद्रावती नगर परिषद निवडणुकीत काल दिवसभर मायबाप मतदारराजाकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. सकाळपासून मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. महिला, युवक आणि ज्येष्ठांचा उत्साह दिवसभर अबाधित राहिल्याने लोकशाहीच्या सणाला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था लाभली.
भाजयुमोचे प्रदेश सचिव व जनसेवक इम्रान खान यांनी आपल्या सर्व परिवारासह तसेच मित्र परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी अत्यंत नम्र आणि मनापासून मतदारांचे आभार मानत म्हटले..!
“मायबाप मतदारराजा माझा खरा आधार! भद्रावतीकरांनी दाखवलेला सहभाग ही लोकशाहीची खरी ताकद आहे.”
शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शांत, सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध वातावरण कायम होते. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मतदानानंतर इम्रान खान यांनी पुढे सांगितले,
भद्रावतीकरांचा आजचा उत्स्फूर्त सहभाग शहराच्या भविष्यातील विकासमार्ग निश्चित करणारा आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी अशा सहभागाची गरज असते. मायबाप मतदारराजाचे मी मनापासून आभार मानतो.”
इम्रान खान यांच्या परिवारासह आणि मित्र परिवारासह मतदानाला उपस्थितीने शहरात दिवसभर चर्चेचा विषय झाला. मतदारराजाला त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि आदर भावनिक प्रतीक म्हणून अनेकांच्या मनात ठसला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!