Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूरतो ‘भलताच यंत्रसंच’ घेतो म्हणे!”

तो ‘भलताच यंत्रसंच’ घेतो म्हणे!”

✍️सहाय्यक संपादक :- प्रमोद दुबे

५० रुपयांचा प्रेसकार्ड…

भाग ५ :-

तो भलताच यंत्रसंच घेतो म्हणे,
छाती फुगवून सांगतो,
नेमकं काय आहे ते विचारलं,
तर स्वतःलाच गोंधळ होतो!

काल दुचाकीवर फिरणारा,
आज मोठा मालक झाल्यासारखा,
पण त्या यंत्रसंचाचं नाव घेताच
तोंडातून शब्दच निघेना सारखा!

स्वयंपाकी आहे हात सफाईचा,
भाजी-भाकरी लई भारी,
पण बातमी लिहायला सांगितली,
तर अक्षरं पळतात सारी!

एके दिवशी जेलवारी झाली,
तेव्हापासून छाती फुगलेली,
“मी पत्रकार!” म्हणत फिरतो,
पण अक्कल मात्र
कुठेतरी डवरापानीला विसरलेली!

डवरापानी शब्द निघताच,
तो लगेच विषय बदलतो,
“तो मी नव्हेच!” म्हणत म्हणत
नवी गोष्ट तयार करतो!

काल म्हणे “मीच यवतमाळ वारी केली,”
आज म्हणे “तो दुसराच गेला,”
पुरावा विचारताच लगेच
“नेट नाही!” हा सूर लागला!

सेल्फी काढून स्टेटस टाकतो,
कॅप्शन “खळबळ उडाली!”
खळबळ नाही रे बाबा,
लोकांच्या पोटात हसूच उडाली!

तो भलताच यंत्रसंच,
भलताच दावा, भलताच बोल,
गाडी बदलते, जिल्हा बदलतो,
पण झोलपणा मात्र कायम गोल!

पारावर आजोबा हसत म्हणाले,
मिशीला देत पीळ
“स्वयंपाकी, जेलवारी,

डवरापानी,
आणि हा भलताच यंत्रसंच…
हा पत्रकार नाही रे,
हा तर फिरता गोंधळ-संच!”

 

शेवटचा हास्यठसा

यंत्रसंच कोणता,
काम कुठलं,
पुरावा काहीच नाही,
पण पकड येताच आठवतं
‘तो मी नव्हेच!’
हेच याचं खरं गाणं भाई!

क्रमशः…
पुढचा भाग :-
“यंत्रसंच आहे… पण चालवणारा कोण?”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!