भद्रावती:- तालुक्यातील मौजा नंदोरी (बु.) येथील शिर नदी च्या पलीकडे वसलेल्या इंदिरानगर वार्डातील नागरिकांना गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नदी ओलांडून नंदोरी किंवा तालुक्याच्या इतर भागात ये-जा करताना सतत पाण्यामुळे होणाऱ्या धोक्यामुळे स्थानिकांनी विविध आंदोलने केली, तर काहीवेळा मतदानावर बहिष्कार ही टाकला.
न. या दीर्घकालीन समस्येला आता पूर्णविराम लाभला असून, आमदार करण देवतळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बंधाऱ्याच्या कामासाठी १.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
भद्रावती तालुक्यातील ही शिर नदी वर्षभर पाणी असलेली असल्याने इंदिरानगरातील शेकडो कुटुंबांना रोजच्या कामकाजात मोठी अडचण भोगावी लागत होती. पूर्वी चांदा ते बांदा योजना अंतर्गत या नदीवर बंधाऱ्याचे काम मंजूर झाले होते. मात्र, निधीच्या अभावी कंत्राटदाराने काम थांबवले आणि प्रकल्प अर्धवट राहिला. या प्रलंबित मुद्द्यावर मागील दहा वर्षांत स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. यश मिळत नसल्याने त्यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देऊन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
आमदार देवतळे यांनी या मागणीला गंभीरतेने घेतली. त्यांनी नंदोरी (बु.) आणि इंदिरानगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्
यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पत्रव्यवहार केला आणि जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत काम मंजूर करण्याची शिफारस केली. या प्रयत्नांना यश लाभले असून, आता सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मृदु व जलसंधारण विभाग मार्फत बांधकाम सुरू होणार आहे. या बंधाऱ्यामुळे इंदिरानगर आणि नंदोरी यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, प्रवास सुरक्षित होईल आणि स्थानिक विकासाला गती मिळेल.
निधी मंजुरीची बातमी कळताच नंदोरी (बु.) आणि इंदिरानगर येथील नागरिकांनी एकत्र येऊन आमदार करण देवतळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “देवतळे यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या दहा वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. हा बंधारा आमच्या भागाचा विकासाचा नवीन अध्याय असेल,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना पाणीटंचाईतून मुक्ती मिळेल आणि जलसंधारणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
करण देवतळे हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे तरुण आमदार म्हणून ओळखले जाणारे नेते आहेत. त्यांच्या पूर्वीच्या प्रयत्नांमुळे वरोरा मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. या बंधाऱ्याच्या मंजुरीने भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामाना नवीन दिशा मिळाली आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


