प्रभाग १४ भिवापूर पठाणपुरा: कमळावर अमोल शेंडे, भाजपची जोरदार एन्ट्री..!
चंद्रपूर न्यूज डेस्क
✍️चंदन देवांगण , वासुदेव नांदूरकरचंद्रपूर महानगरपालिका २०२५,२६ निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून प्रभाग क्रमांक १४ भिवापूर पठाणपुरा येथून भारतीय जनता पक्षने अमोल शेंडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. अमोल शेंडे यांचे निवडणूक चिन्ह कमळ असून, “विकास आणि सेवा” हाच त्यांचा ठाम नारा आहे.
भिवापूर–पठाणपुरा हा प्रभाग मजूर, छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा आहे. रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा हे प्रश्न इथले रोजचे आहेत. हे सगळे प्रश्न जवळून ओळखणारे अमोल शेंडे प्रचारात थेट गावकुसात उतरले आहेत. घराघरात जाऊन भेटी, छोट्या बैठका, चौकात चर्चा असा त्यांचा साधा-सोप्पा पण परिणामकारक प्रचार सुरू आहे.
“बोलघेवड्या भाषणांपेक्षा कामावर माझा भर आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करून दाखवायचा,” असा शब्द अमोल शेंडे देत आहेत. रस्ते नीट करणे, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छतेची व्यवस्था आणि आरोग्य केंद्रांची सुधारणा हे मुद्दे ते ठासून मांडत आहेत.
भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला असून कमळ चिन्हावर मत देण्याचे आवाहन जोरात सुरू आहे. स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे की, “अमोल शेंडे हा प्रभागाचा माणूस आहे. लोकांच्या सुख-दुःखात तो कायम उभा राहिलाय.”
आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १४ मध्ये चुरशीची लढत होणार हे नक्की. पण गावकुसातला माणूस, गावरान भाषा आणि विकासाचा ठाम इरादा या जोरावर अमोल शेंडे मतदारांचा विश्वास जिंकतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना आहे.
एकंदरीत, भिवापूर पठाणपुरा प्रभागात यंदा कमळ फुलणार का? याकडे सगळ्या चंद्रपूरचे लक्ष लागले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


