भद्रावती (प्रतिनिधी):- भद्रावतीतील युवकवर्ग आणि सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे फयाज शेख सध्या शहरात मोठ्या चर्चेत आहेत.
महाविद्यालयीन काळात UR (University Representative) आणि CR (Class Representative) म्हणून काम करताना त्यांनी तरुणांना संघटन क्षमता, निवडणूक प्रक्रियेचा अनुभव आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी कायम प्रोत्साहित केले.
त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे.
युवकांच्या रोजगारविषयक अडचणी, कौशल्यविकास आणि संधी यावर त्यांनी केलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन अनेक बेरोजगार युवकांसाठी आधार बनले आहे. खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार संधींबाबत त्यांनी दिलेल्या माहिती आणि सहाय्यामुळे युवकवर्गात त्यांच्या नावाला विशेष मान मिळाला आहे.
दरम्यान स्थानिक समस्या आणि समाजहितासाठी त्यांनी “भद्रनाग संघटना” स्थापन केली.
या संघटनेद्वारे सामाजिक उपक्रम, स्वच्छता, युवकांना एकत्र आणणारे प्रकल्प, आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यामुळे शहरात सकारात्मक बदल घडल्याचे नागरिक सांगतात.
राजकारणात कोणत्याही एका पक्षाशी स्वतःला न बांधता, “काम सर्वांसाठी” या तत्त्वावर त्यांनी केलेले कार्य नागरिकांना विशेष भावले आहे.
त्यांचा समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि लोकाभिमुख शैलीमुळे युवक नेतृत्वात त्यांची छाप अधिक ठळक होत आहे.
कोरोना काळात सर्वाधिक अडचणीत असलेल्या नागरिकांना लोकवर्गणीच्या माध्यमातून मदत पुरविण्याचे त्यांनी घेतलेले पुढाकार आजही शहरात आदराने आठवले जातात.
याच कार्याची पावती म्हणून फयाज शेख नगर परिषद भद्रावतीत प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत, अशी माहिती स्थानिक पातळीवर चांगलीच चर्चेत आहे.
भद्रावतीतील युवक नेतृत्वात उभरत्या चेहऱ्याप्रमाणे फयाज शेख यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


