Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत दिनी इज्तिमाचा दुसरा दिवस उत्साहात; भाविकांची मोठी गर्दी, स्वंयसेवकांकडून वाहतूक नियंत्रणाची...

भद्रावतीत दिनी इज्तिमाचा दुसरा दिवस उत्साहात; भाविकांची मोठी गर्दी, स्वंयसेवकांकडून वाहतूक नियंत्रणाची चोख व्यवस्था..!

भद्रावती (प्रतिनिधी) :-भद्रावतीत सुरू असलेल्या दिनी इज्तिमा या मोठ्या धार्मिक सभेचा आज दुसरा दिवस असून, सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. श्रद्धाळू वातावरण, नियमित सत्रे आणि धार्मिक मार्गदर्शनामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साह पसरला आहे.
प्रसंगी नागपूर.,चंद्रपूर हायवेवरील पेट्रोल पंपाजवळ लावलेल्या स्पष्ट दिशादर्शक फलकांमुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे.
तसेच इज्तिम्यात कुराणिक शिकवणी, दुआ तसेच नैतिक व सामाजिक विषयांवरील मार्गदर्शनाची सत्रे सुरू असून सर्व वयोगटातील भाविक सहभागी होत आहेत.
दरम्यान, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील स्वंयसेवकांनी पुढाकार घेत वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे.
याशिवाय प्रशासनाशी समन्वय साधून रस्त्यांवर स्वंयसेवकांचा ताफा तैनात करण्यात आला असून, वाहनांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
दोन दिवसांचा हा धार्मिक कार्यक्रम शांततेत, उत्साहात आणि मोठ्या भाविकांच्या सहभागातून पार पडत असून भद्रावतीत सध्या इज्तिम्याचीच चर्चा रंगत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!