Wednesday, April 22, 2026
Homeभद्रावती"या" परिसरातील हातपंप बंद; तातडीने दुरुस्तीची मागणी..!

“या” परिसरातील हातपंप बंद; तातडीने दुरुस्तीची मागणी..!

गवराळा(प्रतिनिधी):-भद्रावती शहरातील गणपती वॉर्ड गवराळा येथील हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
तसेच संबंधित हातपंपाची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
“या” परिसरात २४ तारखेपासून गाडगे महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या तयारीदरम्यान पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी रहिवाशांनी हातपंपाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की,
“हातपंप बंद असल्याने पाण्यासाठी इतरत्र जावे लागते.
प्रसंगी तक्रारी करूनही कोणी पाहणीस आले नाही. महत्त्वाचा उत्सव सुरू होणार असल्याने प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी.”
स्थानिक नागरिक, भक्तगण आणि आयोजकांनीही प्रशासनाला आवाहन केले आहे.
या दरम्यान गाडगे महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर हातपंप कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.
प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा!
नागरिकांकडून होत आहेत..!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!