Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीनाराजीचा शेवट, राजू भाई ; शेकडो कार्यकर्त्यांन सोबत भाजपमध्ये..!

नाराजीचा शेवट, राजू भाई ; शेकडो कार्यकर्त्यांन सोबत भाजपमध्ये..!

भद्रावती (प्रतिनिधी):-
 भद्रावतीत पार पडलेल्या भव्य सभेत झालेल्या राजकीय घडामोडींचा उलगडा आज उशिरा झाला आहे. या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच दिवंगत खासदार बाळू धानोकर यांचे कट्टर समर्थक शेख रियाज अनवर उर्फ राजू भाई यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
वर्षानुवर्षे सातत्याने शिवसेना व काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत राजू भाई यांनी जनमानसात भक्कम स्थान निर्माण केले होते. प्रसंगी दिवंगत खासदार बाळू धानोकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात भक्कम ओळख होती.
मात्र काँग्रेस पक्षात स्वतःकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाल्याने राजू भाई नाराज होते. अखेर या नाराजीचा शेवट दहा दिवसांपूर्वी झालेल्या सभेत झाला आणि त्यांनी थेट भाजपचा झेंडा हाती घेतला.
त्यांच्या प्रवेशावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसाराज अहीर तसेच लोकप्रिय आमदार करण देवतळे उपस्थित होते.
या प्रवेशावेळी शेकडो मित्र परिवार सोबत उपस्थित राहून राजू भाई यांना मोठा प्रतिसाद मिळाला.
राजू भाई यांच्या भाजप प्रवेशामुळे भद्रावतीतील भाजपला मोठी ताकद मिळाल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांतून व्यक्त होत असून, त्यांच्या स्वागतासाठी पक्षात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!