Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीबनावट ताडीची विक्री; इम्रान खान यांनी पोलिसांना माहिती देत कारवाईची मागणी..

बनावट ताडीची विक्री; इम्रान खान यांनी पोलिसांना माहिती देत कारवाईची मागणी..

  • भद्रावती (प्रतिनिधी):-भद्रावती तालुक्यातील मानोरा फाटा जवळील बनावट ताडीची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. क्लोरोहायड्रेट पावडरपासून तयार होणारी ही रासायनिक ताडी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत असल्याची माहिती मिळाली आहे.
    या बेकायदेशीर धंद्यातून काही व्यक्ती दररोज हजारो रुपयांचा नफा कमावत असल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.
    या संपूर्ण प्रकाराची माहिती भाजयुमोचे प्रदेश सचिव तसेच जनसेवक इम्रान खान यांनी स्वतः पोलिस प्रशासनाला दिली आहे.
    तांडा परिसरातील या धंद्यावर चौकाशी करून तात्काळ छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
    प्रसंगी इम्रान खान यांनी सांगितले की,
    “बनावट ताडीमुळे लोकांचे जीव धोक्यात येत आहेत. रासायनिक ताडीची विक्री तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
    दरम्यान, या प्रकरणामुळे नागरिकांत संताप असून, त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!