Wednesday, April 22, 2026
Homeभद्रावतीफोर्ड फिगो कार आणि चोरीचा माल जप्त; भद्रावती पोलिसांची कारवाई..!

फोर्ड फिगो कार आणि चोरीचा माल जप्त; भद्रावती पोलिसांची कारवाई..!

बिल्लूसह वैभव अटकेत..!

भद्रावती (प्रतिनिधी):- भद्रावती पोलीस ठाण्यातील अप क्रमांक ५४५/२५मधील चोरीचा गुन्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उघडकीस आला असून दोन आरोपींना अटक करून २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीसाठी वापरलेली फोर्ड फिगो कार (MH-34-AM-2618) तसेच चोरीचा सर्व माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज राजकुमार देवतळे यांनी २५ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या बैलबंडीवरील चार लोखंडी भाग आणि दोन ट्रॅक्टरवरील पाच हायड्रोलिक पट्टे असा एकूण २६ हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा माग काढत २ लाख ५० हजार रुपयांची फोर्ड फिगो कार आणि चोरीला गेलेले सर्व साहित्य जप्त केले. या प्रकरणात
विनोद उर्फ बिल्लू देवगडे (वय ५८, रा. आंबेडकर वार्ड) आणि
वैभव महादेव दगडी (वय २९, रा. जेना, भिवापूर वार्ड)
या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या वेगवान कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून परिसरात चोरटे बिळात गेले असल्याची प्रतीक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी (वरोरा) संतोष बकाल यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप आष्टुणकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिटगिरे, खुशाल कावळे आणि संतोष राठोड करण्यात आली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!