Wednesday, April 22, 2026
Homeभद्रावतीबोललं माध्यम; हललं प्रशासन! गवराळा हातपंप दुरुस्ती वेगानं सुरू..!

बोललं माध्यम; हललं प्रशासन! गवराळा हातपंप दुरुस्ती वेगानं सुरू..!

बोललं माध्यम; हललं प्रशासन! गवराळा हातपंप दुरुस्ती वेगानं सुरू..!

गवराळा (प्रतीनीधी):-

भद्रावती शहरातील गणपती वॉर्ड गवराळा येथील बंद पडलेल्या हातपंपाच्या दुरुस्तीची बातमी प्रसारमाध्यमांत आली की प्रशासनात तात्काळ हलचाल झाली आणि कामाची गती तुफानी झाली. प्रफुल चटकी यांनी या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देत माध्यमांशी संपर्क साधला आणि हातपंपाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन त्वरित दुरुस्ती कामे सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशांनंतर प्रशासनाने कर्मचारी तात्काळ पाठवून दुरुस्तीचे काम जोरात सुरू केले.

आज सकाळी स्थानिकांनी तज्ञ मंडळाला काम करताना प्रत्यक्ष पाहिले. चटकी यांनी स्पष्ट केले की, येत्या २४ तारखेला होणाऱ्या गाडगे महाराज जयंतीपूर्वी पाण्याप्रश्नी कोणतीही अडचण होऊ नये यासाठी सर्व आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. पूर्वी अनेक तक्रारी असूनही हातपंप दुरुस्तीचा विसर करून आलेले प्रशासन आता माध्यमांच्या बातमीमुळे हळूहळू सक्रिय झाले आहे.

स्थानिक रहिवासी आणि भक्तांनी या जलद कारवाईचे उत्साहाने स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले, “बातमी झाली आणि कामाला तात्काळ वेग आला!” ही घटना स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारी आणि माध्यमांच्या महत्त्वाची साक्ष देणारी ठरली आहे.
हा प्रकार प्रशासन आणि माध्यम यांच्यातील आनंददायी संवाद आणि तत्परतेचा उत्तम उदाहरण ठरतो असून आगामी काळात अशी तत्परता कायम रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!