Tuesday, April 21, 2026
Homeचंद्रपूरअवैध सावकारीविरोधात पोलिसांचे जाहीर आवाहन; ब्रहमपुरी प्रकरणात ५ आरोपी ताब्यात!

अवैध सावकारीविरोधात पोलिसांचे जाहीर आवाहन; ब्रहमपुरी प्रकरणात ५ आरोपी ताब्यात!

अवैध सावकारीविरोधात पोलिसांचे जाहीर आवाहन; ब्रहमपुरी प्रकरणात ५ आरोपी ताब्यात!

चंद्रपूर (प्रतिनिधी):-
अवैध सावकारीविरोधात कठोर भूमिका घेत चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. ब्रहमपुरी तहसील परिसरातील अवैध सावकारी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत ५ आरोपींना ताब्यात घेतले असून तपास अधिक वेगाने सुरू आहे.
पोलिस तपासात काही सावकारांकडून परवाना नसताना अवाजवी व्याज आकारणे, कर्जदारांवर मानसिक दबाव टाकणे, धमकी देणे तसेच आर्थिक शोषण केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे माहिती देण्याचे आवाहन केले असून, अवैध सावकारीबाबत तक्रार किंवा माहिती असल्यास पोलीस आपत्कालीन क्रमांक 112 किंवा 7887890100 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अवैध सावकारीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान होत असून, अशा समाजविघातक प्रवृत्तींचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहेत

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!