Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूर"या" झोलाशाप पत्रकारांचा  … ! रोज नवीन अध्याय..!

“या” झोलाशाप पत्रकारांचा  … ! रोज नवीन अध्याय..!

✍️ सहाय्यक सपांदक:- प्रमोद दुबे

धमक्या, फुशारक्या आणि ओव्हरॲक्टिंग ..!
चंद्रपूरच्या चार झोलाशाप पत्रकारांचा हास्यास्पद..!

प्रकार (भाग २)

चंद्रपूर शहरात सध्या एक वेगळ्याच प्रकारची “करमणूक” सुरू असून, ती कोणत्या नाट्यगृहात नाही तर सरकारी कार्यालये, रस्ते आणि फोन कॉलवर पाहायला मिळत आहे. हातात अवघ्या ५० रुपयांचा प्रेसकार्ड आणि तोंडात “मी पत्रकार आहे” हा एकच डायलॉग घेऊन चार झोलाशाप पत्रकार शहरात फिरत असल्याचे चित्र आहे.
पहिल्या भागानंतर सर्वांनाच वाटले होते की आता हा प्रकार थांबेल. मात्र तसे न होता, या नाट्यप्रयोगाचा दुसरा भाग अधिकच हास्यास्पद ठरत आहे.
व्हॉट्सॲपवरून पत्रकारिता
या चारही जणांची पत्रकारिता थेट व्हॉट्सॲपवर चालते.
ना माहितीची खात्री,
ना तथ्यांची पडताळणी..!
फक्त फॉरवर्ड आणि फुशारक्या.
आज ब्रेकिंग, उद्या खंडन आणि परवा पुन्हा नवी “खळबळजनक बातमी”, असा हा सिलसिला सुरू आहे.
फोनवर धमकी, समोर अभिनय..!
फोन लागला की आवाज अचानक बदलतो.
“आज बातमी टाकतो”,
“वरपर्यंत ओळख आहे”,
असे संवाद ऐकून समोरचा क्षणभर गोंधळतो आणि पुढच्या क्षणी हसतो.
कर्मचारी वैतागतात, अधिकारी डोके धरतात आणि खरी पत्रकारिता मात्र बाजूला उभी राहते.
गडचिरोलीपर्यंत फोन कॉल..!
या चौघांपैकी एक जण थेट गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी वर्गाला फोन करून
“मी चंद्रपूरचा पत्रकार आहे, बातमी टाकतो”
अशी भाषा वापरत असल्याची चर्चा आहे.
या कॉलमुळे अधिकारी वर्गात गोंधळ कमी आणि करमणूक जास्त होत असल्याचे बोलले जात आहे.
सेल्फी म्हणजेच बातमी..!
घटना घडली की नाही, यापेक्षा
सेल्फी आली की नाही, याला जास्त महत्त्व.
छातीवर प्रेसकार्ड, हातात मोबाईल आणि सोशल मीडियावर पोस्ट
“मीच बातमी!”
जिल्हा बदल, प्रकार तोच
चंद्रपूरमध्ये लोक कंटाळले की लगेच नवीन स्टेज.
गडचिरोली, यवतमाळ, वर्धा…
जिल्हा बदलतो, पण नाटक तेच राहते.
नागरिक काय म्हणतात?
नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत…!
“हे पत्रकार आहेत की फिरते कॉमेडियन?”
“५० रुपयांचा प्रेसकार्ड इतका भारी कसा?”
“ही पत्रकारिता आहे की विनोदी कार्यक्रम?”
शेवटचा सीन..!
एकूणच हा प्रकार पाहता, शहरात बातम्यांपेक्षा हशा जास्त पिकत आहे.
नागरिकांची एकच अपेक्षा आहे.
या हास्यास्पद महानाट्यावर लवकरात लवकर पडदा पडावा
आणि पत्रकारितेचा दर्जा तरी वाचावा.
तोपर्यंत,
चंद्रपूरकर म्हणतात.
“बातमी वाचायची असेल तर पेपर बघा,
आणि हसायचं असेल तर ५० रुपयांचा प्रेसकार्ड शोधा!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!