चंद्रपूर :-
पडदा उघडतो…
हातात फक्त ५० रुपयांचा प्रेसकार्ड,
छातीत अवाजवी आत्मविश्वास,
तोंडात एकच संवाद “मी पत्रकार आहे!”
आणि डोक्यात मात्र वसुलीची स्क्रिप्ट!
चंद्रपूर शहरात सध्या सुरू असलेला हा प्रकार बातमी नाही,
तर पूर्ण लांबीचा हास्यास्पद,
धक्कादायक नाट्यप्रयोग ठरत आहे.
पहिला अंक ..!
जेलवारी
चार झोलाशाप पत्रकार…
पोलिसांनी जाळे टाकले…
हातकड्या चमकल्या…
नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला…
सर्वांना वाटलं ..“नाटक संपलं!”
पण नाही…!
इंटरव्हलही पडला नाही!
दुसरा अंक..!
जेलमधून थेट ‘कमबॅक’
जेलमधून बाहेर पडताच
न पश्चात्ताप…
न सुधारणा…
फक्त प्रेसकार्ड खिशात आणि वसुली पुन्हा हातात!
जणू काही जेल नव्हे,
तर रिहर्सल क्लासच झाला होता!
तिसरा अंक ..!
अधिकारी त्रस्त
शासकीय..!
निमशासकीय कार्यालयांत
धडाधड एंट्री…
आवाज जड, चेहरा कडक…
“बातमी टाकतो सांगू?”
हा डायलॉग ऐकून अधिकारी गोंधळले,
कर्मचारी वैतागले,
आणि खरी पत्रकारिता… लाजेने मान खाली घालून उभी राहिली.
चौथा अंक..!गडचिरोली ते यवतमाळ..!
चंद्रपूरमध्ये प्रेक्षक कंटाळले…
मग नाटककारांनी ठरवलं..!
“नवं जिल्हा, नवं स्टेज!”
आता हा तमाशा थेट यवतमाळकडे
जणू पत्रकारिता नाही,
तर फिरती ड्रामा कंपनी!
संवाद जो शहरात गाजतोय..कसा!
एका कर्मचाऱ्याचा डायलॉग सध्या व्हायरल आहे
“५० रुपयांचा प्रेसकार्ड,
पण रुबाब ५०० चा!
हा पत्रकार आहे की स्टँड-अप कॉमेडियन?”
शेवटचा अंक कसा हे पण बघा..!
नागरिकांचा संताप,,,नागरिक आता हसत नाहीत,
ते थेट सवाल विचारत आहेत.
“जेलमधून येऊनही शहाणपण नाही?”
“प्रेसकार्ड आहे की लोकांना घाबरवण्याचा परवाना?”
“ही पत्रकारिता की विनोदी वसुली योजना?”
क्लायमॅक्स तर बघा…!
शहराची एकमुखी मागणी
या महानाट्यावर आता पडदा टाका..!
प्रेसकार्डचा गैरवापर थांबवा;
आणि खरी पत्रकारिता वाचवा
कारण…!
पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे,
आणि ५० रुपयांचा प्रेसकार्ड
कोणाच्याही हातात नाट्यमय शस्त्र होऊ नये!
नाटक खूप झालं… आता ‘एन्ड क्रेडिट्स’ लागावेत!✍️सहाय्यक संपादक:-प्रमोद दुबे
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


