वणीचा हप्ता, यवतमाळची झोप,
अक्ल आंब्याच्या झाडावर… आणि स्वयंपाक मात्र भारी!✍️ सहाय्यक संपादक :- प्रमोद
दुबे५० रुपयांचा प्रेसकार्ड…
चंद्रपूर :-यवतमाळमध्ये मध्य रेस्ट करून चहा-बिस्किटं फस्त,
आणि वणीत पाऊल टाकताच
छाती फुगली, डोळे फिरले, आवाज वाढला…
जणू काही देश हादरवणारी बातमीच फुटणार!एन्ट्री अशी की
लोक म्हणाले…!
“अरे, बातमी करायला आलेत की
लग्नाची वरात काढलीये?”एक पुढे, एक मागे,
तिसरा मोबाईलवर “लाईव्ह”चा अभिनय,
आणि चौथा?
तो तर आधीच गायब!
(बहुतेक आधी जेलवारी करून आलेला!)बातमी नाही… भावताव सुरू!
दुकानासमोर उभं राहून
कॅमेरा चमकवला,
आणि कुजबुज…
“बातमी टाकू का…
की समजूतदारपणा दाखवू?”समोरचा दुकानदार सरळ विचारतो…
“किती?”उत्तर येतं….,
“जास्त नाही…
आजचा चहा-पाणी!”विजीटिंग कार्ड भरपूर… अक्षर मात्र कमी!
या झोलाछाप पत्रकारांकडे
प्रेसकार्ड एक…
पण विजीटिंग कार्ड दहा!एक कार्ड…
या ऑफिसचं
दुसरं…
त्या ऑफिसचं
तिसरं…
कधी नावही न ऐकलेला चॅनल!लिहायला सांगितलं तर
पेन हातात घेताच घाम,
नेट नाही,
सिग्नल नाही,
बॅटरी संपली!गावकऱ्यांचा टोमणा..!
“बातमी लिहिता येत नाही,
पण कार्ड वाटायला हात दुखत नाही!”
स्वयंपाक येतो… पत्रकारिता नाही!
गावात अजून एक गुपित उघड झालं….!
या पैकी एकाला स्वयंपाक मात्र जबरदस्त येतो!बातमी लिहायला दिली तर
दोन ओळींत दमछाक,
पण भाजी-भाकरी,
वरण-भात,
आणि चहा बनवायला
हात सफाईदार!लोक म्हणाले.
“पत्रकारिता सोडा,
हॉटेल टाका…
जास्त प्रामाणिक धंदा होईल!”
जेलवारीची आठवण अजून ताजी!
या महान मंडळींपैकी
कोण जेलवारी करून आले,
हे गाव विसरलेलं नाही!जेलमधून बाहेर येताच
पुन्हा छातीवर प्रेसकार्ड,
आणि तोंडात…
“मी पत्रकार आहे!”गावकऱ्यांचा सवाल…
“जेलची हवा खाल्ली,
पण अक्कल अजून बाहेरच राहिली!”
अकाऊंटमध्ये लाखो… आणि नागपूरची हाक!
या नाट्यात अजून एक धमाका..!
एका महाशयांच्या
अकाऊंटमध्ये अचानक लाखो रुपये जमा!बातमी कुठलीही नाही,
पण पैसे मात्र भरपूर!आणि लगेच
नागपूरला बोलावणं आलं!लोक हसत म्हणाले..
“बातमी नाही,
पण बँक स्टेटमेंट भारी!”
पंचनामा… पण फोनच पंच!
“पंचनामा करतो!”
म्हणून उभे राहिले,
पण कागद नाही,
पेन नाही,
साक्षीदार नाही!मग काय…!
सेल्फी काढली,
स्टेटस टाकला..!
“घटनास्थळी पंचनामा सुरू!”लोक हसले….
“अरे पंच कोण?
फोनच पंच का?”पळापळ… ऑलिम्पिक निवड!
जरा आवाज वाढला,
तर गाडीला गॅस,
दुचाकीला किक,
आणि मोबाईल कानाला.
“हो साहेब… आम्ही निघालोच!”एक जण चपला विसरला,
दुसरा प्रेसकार्ड उलटा,
तिसरा म्हणतो..
“नेट नाही!”गावकऱ्यांचा अंतिम निकाल..!
चहाच्या टपरीवर ठराव झाला…!
“हे पत्रकार नाहीत,
हे तर फिरते कॉमेडी शो आहेत!”पारावर आजोबा म्हणाले
“५० रुपयांचा प्रेसकार्ड,
दहा विजीटिंग कार्डं,
जेलवारीची आठवण,
अकाऊंटमध्ये लाखो…
आणि अक्ल मात्र
आंब्याच्या झाडावर झुलते!”
शेवटचा ठसका..!
एकूण काय..!
वणीत हप्ता-हास्य,
यवतमाळला घोरणं,
नागपूरला हजेरी,
आणि पत्रकारिता
फक्त अभिनयापुरती!क्रमशः…
पुढचा भाग :-
“लाईव्ह सुरू… पण पळताना बंद!”
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


