Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीसेवेचा प्रवास सुरूच; रविंद्रकुमार गड्डमवार यांची जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती..!

सेवेचा प्रवास सुरूच; रविंद्रकुमार गड्डमवार यांची जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती..!

भद्रावती:-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका भद्रावतीच्या वतीने श्री. रविंद्रकुमार काशिनाथ गड्डमवार यांची सांध्य दैनिक आदि मानव या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच गड्डमवार यांनी यापूर्वी नगर परिषदेमधील वरिष्ठ पदावर दीर्घकाळ सेवा बजावली असून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनतेशी असलेली आपुलकी ही त्यांची ओळख असून, त्यांच्या या अनुभवाचा लाभ आता पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला मिळणार आहे.
दरम्यान सत्यनिष्ठ पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताची जाण ठेवून श्री. गड्डमवार हे थेट प्रसारण माध्यमातून शासनाच्या विविध सेवा, योजना व लोकहिताशी संबंधित माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार आहेत. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचा दुवा म्हणून ते जनसेवकाच्या भूमिकेत प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका भद्रावती तसेच सांध्य दैनिक आदि मानव यांच्या वतीने श्री. रविंद्रकुमार काशिनाथ गड्डमवार यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!