मूल:- प्रतिनिधी
जुबेद शेख✍️
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या अंतर्गत दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित नागपूर विभागीय शिक्षक पोस्टर स्पर्धेत नवभारत विद्यालय, मुल (ता. मुल, जि. चंद्रपूर) येथील भारत हरिदास सलाम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा परभणी येथे होणार आहे.
याप्रसंगी नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विषयाची मांडणी, कल्पकता आणि शैक्षणिक आशय यामुळे भारत सलाम यांचे पोस्टर परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.
तसेच अध्यापनासोबतच सहशालेय उपक्रम, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शिक्षक म्हणून भारत सलाम यांची ओळख आहे. त्यांच्या या यशामुळे नवभारत विद्यालयाचा नावलौकिक वाढला असून शाळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव झाडे, पर्यवेक्षिका सौ. वर्षा भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भारत सलाम यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


