Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर शहरात CCTV बसवा; मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी, प्रकाश देवतळे

चंद्रपूर शहरात CCTV बसवा; मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी, प्रकाश देवतळे

चंद्रपूर न्युज डेस्क✍️

चंद्रपूर शहरात वाढती गर्दी, धार्मिक आयोजनं तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी CCTV यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी भाजप नेते प्रकाश देवतळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, निवेदनात देवतळे यांनी स्पष्ट केले की, शाळा, कॉलेज परिसर तसेच युवकांची वर्दळ असलेल्या भागात CCTV बसवल्यास अमली पदार्थांची विक्री व त्यासंबंधित हालचाली सहजपणे लक्षात घेता येतील. काही भागात तरुणांना लक्ष्य करून घातक अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी येत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी CCTV प्रभावी ठरू शकते.

या प्रसंगी त्यांनी सांगितले की, शाळा-कॉलेज परिसर, बसथांबे, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी CCTV असल्यास संशयित हालचाली तात्काळ निदर्शनास येतील, विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढेल आणि पालकांमध्ये विश्वास निर्माण होईल. याशिवाय, एखादी अनुचित घटना घडल्यास तपासासाठी ठोस पुरावे उपलब्ध होतील.

याशिवाय, CCTV यंत्रणेसाठी खनिज निधी (DMF) किंवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात सकारात्मक सहकार्य करावे, असेही देवतळे यांनी नमूद केले.
असे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास अमली पदार्थ विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल आणि चंद्रपूर शहर अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास भाजप नेते प्रकाश देवतळे यांनी व्यक्त केला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!