सत्ता कोणाची? चंद्रपुरात भाजपचा नवा डाव..!
चंद्रपूर न्युज डेस्क ✍️
चंद्रपूर:- राजकारण हे बुद्धीबळाच्या खेळासारखे असतेयोग्य वेळी योग्य चाल टाकणारा बाजी मारतो, हे चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ नंतर निर्माण झालेल्या सत्ता समीकरणांत भारतीय जनता पक्षाने ‘महापौरपदाची ऑफर’ देत काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना मोठा धक्का दिला आहे.
निवडणूक निकालानुसार काँग्रेस ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३४ जागांपासून तो चार जागांनी दूर आहे. दुसरीकडे भाजपकडे २४, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडे ६ नगरसेवक आहेत. उर्वरित जागांमध्ये अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि एमआयएमचा समावेश आहे. त्यामुळे कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नसल्याने सर्वच पक्षांचे लक्ष युती आणि पाठिंब्यावर केंद्रित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट भूमिका घेत राजकीय वातावरण तापवले आहे. शिवसेना (उबाठा) गटासोबत झालेल्या चर्चांमध्ये त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “कुठल्याही परिस्थितीत भाजप महापौरपद सोडणार नाही. वेळ पडली तर भाजप विरोधी बाकांवर बसण्यासही तयार आहे.” मात्र, भाजपचा महापौर मान्य असल्यास सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची ऑफर शिवसेनेसमोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या या रणनीतीमुळे काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या गणितात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून अपक्ष व इतर छोट्या पक्षांशी संपर्क सुरू असला, तरी भाजपने उचललेली ही चाल निर्णायक ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. “महापौरपद हा केवळ पदाचा प्रश्न नसून, तो शहराच्या दिशादर्शक नेतृत्वाचा विषय आहे,” अशी भूमिका भाजपकडून मांडली जात आहे.
दरम्यान, चंद्रपूरच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला आहे. आगामी काळात शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, उद्योग आणि रोजगारनिर्मिती यांसाठी ठोस निर्णय घेण्यासाठी भाजपचाच महापौर आवश्यक असल्याचे मत मांडण्यात येत आहे.
या घडामोडींमुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली असून, महापौरपदाच्या निवडणुकीआधी नगरसेवकांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचा हा राजकीय डाव काँग्रेससाठी अडचणी वाढवणारा ठरणार की नवे आघाडीसमीकरण आकाराला येणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


