न्यूज डेस्क:- राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २९ महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरक्षण सोडतीनुसार सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गांसह महिला व खुल्या प्रवर्गात विभागणी करण्यात आली आहे.
आरक्षणाचे प्रमाण..!
संपूर्ण राज्यातील २९ महापालिकांमध्ये अनुसूचित जमाती – १, अनुसूचित जाती – ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – ८ तर सर्वसाधारण – १७ असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे
महिलांसाठी ५० टक्के आरक्षण सर्व प्रवर्गांमध्ये लागू करण्यात आले आहे.
आरक्षण प्रक्रिया संपूर्णपणे चक्राकार पद्धतीने पार पडली आहे आणि यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे.
प्रमुख शहरांचे आरक्षण पुढील. .!आरक्षणानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, मालेगाव, नांदेड-वाघाळा व धुळे येथे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे.
ठाणे येथे अनुसूचित जाती (महिला/पुरुष) प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले आहे
कल्याण-डोंबिवली येथे अनुसूचित जमाती (महिला/पुरुष) प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरार, सोलापूर, अमरावती, शिरडी-निजामपूर व परभणी येथे महापौर पद सर्वसाधारण (महिला/पुरुष) प्रवर्गात राहणार आहे.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेत महापौर पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात निश्चित करण्यात आला आहे.
ओबीसी आणि अनुसूचित प्रवर्गांचे आरक्षण..ओबीसी प्रवर्गासाठी पनवेल, अकोला (महिला), कोल्हापूर, जळगाव (महिला), उल्हासनगर, अहिल्यानगर (महिला), चंद्रपूर (महिला) व इचलकरंजी या महापालिकांना आरक्षण दिले आहे.
लातूर येथे अनुसूचित जाती (महिला) तर जालना येथे अनुसूचित जाती (एससी महिला) प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
महापौर पद आरक्षण .संपूर्ण यादी
| क्रमांक | महापालिका | आरक्षण |
|——–|———–|——–|
| १ | मुंबई | सर्वसाधारण (महिला) |
| २ | पुणे | सर्वसाधारण (महिला) |
| ३ | नागपूर | सर्वसाधारण (महिला) |
| ४ | पिंपरी-चिंचवड | सर्वसाधारण (महिला/पुरुष) |
| ५ | ठाणे | अनुसूचित जाती (महिला/पुरुष) |
| ६ | नाशिक | सर्वसाधारण (महिला) |
| ७ | कल्याण-डोंबिवली | अनुसूचित जमाती (महिला/पुरुष) |
| ८ | छत्रपती संभाजीनगर | सर्वसाधारण (महिला/पुरुष) |
| ९ | वसई-विरार | सर्वसाधारण (महिला/पुरुष) |
| १० | सोलापूर | सर्वसाधारण (महिला/पुरुष) |
|११ | नवी मुंबई | सर्वसाधारण (महिला) |
| १२ | मीरा-भाईंदर | सर्वसाधारण (महिला) |
| १३ | अमरावती | सर्वसाधारण (महिला/पुरुष) |
| १४ | पनवेल | ओबीसी (महिला/पुरुष) |
| १५ | शिरडी-निजामपूर | सर्वसाधारण (महिला/पुरुष) |
| १६ | नांदेड-वाघाळा | सर्वसाधारण (महिला) |
| १७ | अकोला | ओबीसी (महिला) |
| १८ | मालेगाव | सर्वसाधारण (महिला) |
| १९ | कोल्हापूर | ओबीसी (महिला/पुरुष) |
| २० | सांगली–मिरज–कुपवाड | सर्वसाधारण (खुला) |
| २१ | जळगाव | ओबीसी (महिला) |
| २२ | धुळे | सर्वसाधारण (महिला) |
| २३ | उल्हासनगर | ओबीसी (महिला/पुरुष) |
| २४ | लातूर | अनुसूचित जाती (महिला) |
| २५ | अहिल्यानगर | ओबीसी (महिला) |
| २६ | चंद्रपूर | ओबीसी (महिला) |
| २७ | परभणी | सर्वसाधारण (महिला/पुरुष) |
| २८ | इचलकरंजी | ओबीसी (महिला/पुरुष) |
| २९ | जालना | अनुसूचित जाती (एससी महिला) |राजकीय प्रभाव..!
या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना संधी मिळणार असून राजकीय पक्षांनी उमेदवार निवड व रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
आरक्षण सोडतीनंतर राज्यभर विविध राजकीय पक्षांमध्ये व्यस्त राजकीय हालचाली दिसून येत आहेत..
आगामी महापालिका निवडणुकांचे वातावरण अधिक तापण्याची शक्यता लक्षात येत आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


