Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत अवैध वाळू-रेतीवर कारवाई अधिक तीव्र होणार.. सध्या कार्यरत तहसीलदारांचे स्पष्ट मत...

भद्रावतीत अवैध वाळू-रेतीवर कारवाई अधिक तीव्र होणार.. सध्या कार्यरत तहसीलदारांचे स्पष्ट मत…

यापूर्वीचे   ! तहसीलदारांचा 

 नेतृत्वात झालेल्या प्रभावी कारवायांचा संदर्भ..+

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू व रेती उपशाबाबत प्रसारमाध्यमांतून माहिती समोर आल्यानंतर सध्या कार्यरत भद्रावती तहसीलदार यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणी तहसील प्रशासनामार्फत कारवाई सुरू असून पुढील काळात ती अधिक तीव्र व प्रभावी स्वरूपात राबवली जाणार आहे.

तालुक्यातील काही भागांमध्ये नदी पात्र व परिसरात नियमबाह्य पद्धतीने वाळू-रेती उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.
या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या आधारे संबंधित प्रकरणांची माहिती संकलित करण्यात आली असून, महसूल कायद्याच्या चौकटीत राहून दंडात्मक कारवाई तसेच अवैध वाहने जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

यावेळी तहसीलदारांनी हेही स्पष्ट केले की, यापूर्वीचे तत्कालीन तहसीलदार यांच्या नेतृत्वात अवैध वाळू-रेती उपशावर प्रभावी व ठोस कारवाया करण्यात आल्या होत्या.
त्या काळात नियमबाह्य उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेत प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला होता.
त्याच धर्तीवर सध्याचे तहसील प्रशासनही कोणतीही तडजोड न करता कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही करणार असल्याचे नमूद करण्यात आले.

“अवैध वाळू-रेती उपसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे.
यापूर्वी जशी प्रभावी कारवाई झाली, तशीच पुढेही सातत्याने केली जाईल,” असे ठाम मत सध्या कार्यरत तहसीलदारांनी व्यक्त केले.

दरम्यान, नागरिक व ग्रामस्थांनी अवैध उत्खननाबाबत मिळालेली माहिती थेट तहसील कार्यालयाकडे कळवावी, जेणेकरून वेळेत कायदेशीर कार्यवाही करता येईल, असे आवाहनही करण्यात आले आहे. तहसील प्रशासनाच्या या ठाम भूमिकेमुळे भद्रावती तालुक्यातील अवैध वाळू-रेती तस्करीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!