Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीभद्रावती तालुक्यात अनधिकृत विटा भट्ट्यांचा सुळसुळाट; प्रत्येक भट्टीत दहा लाख विटांची निर्मिती...

भद्रावती तालुक्यात अनधिकृत विटा भट्ट्यांचा सुळसुळाट; प्रत्येक भट्टीत दहा लाख विटांची निर्मिती झाल्याची चर्चा..!

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत विटा भट्ट्या सुरू असल्याची बाब समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील काही भागांत माती उत्खननाची आवश्यक परवानगी न घेता विटा निर्मिती सुरू असल्याची चर्चा आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विटा भट्टी धारकांकडून अवैधरित्या माती उपसा करून प्रत्येक भट्टीमागे अंदाजे दहा लाख विटांची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकूण तयार झालेल्या विटांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विटा भट्टी व्यावसायिकांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अंदाजे सात ते आठ विटा भट्टी धारकांनीच अधिकृत परवानगी घेतलेली आहे, तर उर्वरित भट्ट्या परवानगीविना कार्यरत असल्याची चर्चा आहे. तथापि, याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही.

या विटा तयार करण्यासाठी लागणारी माती नेमकी कुठून आणण्यात आली, संबंधित रॉयल्टी भरली आहे का, तसेच आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुक्यात एकूण किती विटा भट्ट्या कार्यरत आहेत, त्यापैकी किती जणांनी अधिकृत उत्खनन परवानगी घेतली आहे व किती विनापरवाना सुरू आहेत, याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. अवैध माती उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तालुका प्रशासनवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत असून संपूर्ण प्रकरणाकडे भद्रावती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!