Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीऑनलाईन बेटिंग करताना इसम रंगेहात; स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची पुन्हा एकदा दमदार...

ऑनलाईन बेटिंग करताना इसम रंगेहात; स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची पुन्हा एकदा दमदार एन्ट्री..!

“सिक्सरवर पैसा, पण पोलिसांचा यॉर्कर भारी!”

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

टी, २० सामन्यात वेस्टइंडिज विरुद्ध झिम्बाब्वे सामना रंगात आला होता… मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडत होता… आणि सुमठाणा चौकात मोबाईलवर पैशांचा!
पण या “डिजिटल स्टेडियम”मध्ये अचानक एन्ट्री झाली ती स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांची  आणि सामना तिथेच संपला!

दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत विलास शंकरराव पारखी (वय ४२, रा. खापरी ता. भद्रावती) हा आपल्या मोबाईलवर ऑनलाईन बेटिंग करताना आढळला. म्हणे, “हा बॉल सिक्सर जाईल!” म्हणत असतानाच पोलिसांचा यॉर्कर थेट मोबाईलवर पडला… आणि स्क्रीनवरचा गेम थेट ‘लॉगआउट’!

जप्त मुद्देमाल , “मोबाईलच झाला विकेट”

मोबाईल फोन, १० हजार रूपये किंमत

ऑनलाईन जुगाराचे स्क्रीनशॉट डिजिटल पुरावे
एकूण मुद्देमाल १० हजार रुपये..

या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्र. ४१३/२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) r/w ४९ BNS अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात आकाश शाहू (रा. पंचशील वार्ड, भद्रावती) हा पाहिजे आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे.
,,,,
मैदानावर फलंदाज… पण मैदानाबाहेर एलसीबीचाच दबदबा!

क्रिकेटचा थरार पाहताना काही जण “रन”पेक्षा “रुपये” मोजत होते. पण भद्रावतीत सध्या वेगळीच कॉमेंट्री सुरू आहे
“एलसीबी मैदानात उतरली
की, बेटिंगवाल्यांची विकेट
आपोआप पडली!”
,,,,
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांची ही सलग आणि सततची कारवाई आता चर्चेचा विषय ठरली आहे. अवैध दारू असो की ऑनलाईन जुगार . एलसीबीने ‘फुल फॉर्म’मध्ये असल्याचे दाखवून दिले आहे.

गावात आता नवी म्हण ट्रेंडमध्ये

“सिक्सर मारायचा विचार करा, पण कायद्याचा यॉर्कर लक्षात ठेवा!”

“मोबाईलवर सट्टा? एलसीबीचा बाऊंसर तयारच आहे!”

“बेटिंग केली की विकेट पडली… कारण एलसीबी सतत पिचवर उभी आहे!”

भद्रावतीत एकच चर्चा
गुन्हेगार खेळ बदलतात, पण स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर सतत ‘ऑन ड्युटी’ आणि ‘ऑन फायर’!

सदर बातमी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार...!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!