Friday, April 17, 2026
Homeभद्रावती“मांगलीत अवैध दारूचा ‘डबल धमाका’!” धीरज वरारकर यांच्यावर कारवाई..!

“मांगलीत अवैध दारूचा ‘डबल धमाका’!” धीरज वरारकर यांच्यावर कारवाई..!

सकाळी एक्साईज, सायंकाळी पोलिसांची एन्ट्री; धीरज वरारकरवर दिवसातून दोनदा कारवाई..!

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

मांगली गावात अवैध दारू विक्रीचा प्रकार इतका ‘जोरात’ सुरू होता की २४ फेब्रुवारी २०२६ हा दिवस धीरज वरारकर यांच्यासाठी अक्षरशः ‘रेड डे’ ठरला! सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक, तर सायंकाळी पोलिसांच्या डीबी पथकाचा छापा एकाच दिवशी दोन कारवाया झाल्याने गावात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळी ९ वाजता: एक्साईजचा पहिला धक्का

वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या पथकाला मांगली येथे धीरज वरारकर आपल्या घराजवळ देशी दारूची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सकाळी सुमारे ९:०० वाजता टाकलेल्या छाप्यात ९० मि.ली. क्षमतेच्या सुमारे ८० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. मुद्देमाल ताब्यात घेऊन संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सायंकाळी ६ वाजता: पोलिसांची ‘डबल कन्फर्म’ कारवाई

सकाळच्या कारवाईनंतरही सायंकाळी पुन्हा हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाल्याने भद्रावती पोलीस ठाण्याच्या डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथकाने सुमारे ६:०० वाजता पुन्हा छापा टाकला. यावेळी आरोपींकडून तब्बल ९० मि.ली.च्या सुमारे २०० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून एनटॉर्क १२५ ही दुचाकीही ताब्यात घेण्यात आली.

गावकऱ्यांमध्ये आता एकच चर्चा “सकाळी बाटल्या कमी, सायंकाळी जास्त… हा ‘स्टॉक अपडेट’ होता की धाडसाचा अतिरेक?” एकाच दिवशी दोन वेळा कारवाई होणे ही दुर्मिळ बाब मानली जात असून प्रशासनाने अवैध दारूविरोधात कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

गावातील चर्चेतून..माहीती

दोन्ही कारवायांमध्ये जप्त मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून धीरज वरारकर यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

मांगलीत आता प्रश्न असा“दारूचा धंदा की धाडसाचा प्रयोग?” प्रशासनाच्या या ‘डबल अॅक्शन’मुळे मात्र अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!