भद्रावतीत “बाटली एक्सप्रेस” पकडली!
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची एंट्री ,आणि ‘होम डिलिव्हरी’चा गेम ओव्हर!
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यात काही दिवसांपासून “रात्री पेट्या, सकाळी चिल्लर” अशी जी चर्चा गावोगावी रंगली होती, त्या कथित ‘बाटली एक्सप्रेस’ला अखेर ब्रेक लागलाय! आणि तोही थेट स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या धडाकेबाज स्टाईलमध्ये.
मानोरा फाटा येथे सापळा रचून पथकाने प्रणय राऊत (वय ३१, रा. काटवल तुकूम) याला मोपेडवरून ‘विशेष माल’ नेत असताना रंगेहाथ पकडले. ७० हजारांची मोपेड आणि प्रत्येकी ९० एमएलच्या २०० देशी दारूच्या शिश्या
असा एकूण ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर, “कुरिअर सर्व्हिस” थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली!
या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप.क्र. ४१२/२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
—
जीपीएसपेक्षा जलद सेवा… पण एलसीबी त्याहून जलद!
गावात बस उशिरा येते, वीज जाते, नेटवर्क गायब होते… पण म्हणे पेट्या मात्र वेळेवर पोहोचतात!
मात्र यावेळी “बाटली राज”चा हिशोब चुकला. कारण मैदानात उतरली होती स्थानिक गुन्हे शाखा!
ज्यांची एंट्री झाली की ‘सीन कट’ होतो, अशा एलसीबीने अचूक टायमिंग साधत धाड टाकली आणि ‘होम डिलिव्हरी’चा प्लॅनच कोलमडला.
आता गावात नवी म्हण सुरू…
“पेट्या आधी, विक्री नंतर” ऐवजी आता नवी म्हण फिरतेय
“एलसीबी आली की बाटली खाली!”
दरम्यान, या साखळीमागचे मोठे मासे कोण? अजून कोण कोण या ‘सेवे’त सहभागी? याचा तपास सुरू असून पुढे आणखी उलगडे होण्याची शक्यता आहे.
“प्रणव राऊत हा अटकेत शेवट…
भद्रावतीत सध्या एकच चर्चा
‘बाटली एक्सप्रेस’ थांबली, कारण एलसीबी एक्सप्रेस धावली!


