Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीदानपेटीवर डल्ला… पण भद्रावती पोलिसांची एन्ट्री; काही तासांत गुन्ह्याचा उलगडा!

दानपेटीवर डल्ला… पण भद्रावती पोलिसांची एन्ट्री; काही तासांत गुन्ह्याचा उलगडा!

मंदिर फोडीप्रकरणी आरोपी जेरबंद; रोकड व सब्बल जप्त..!

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती येथील बाजार वॉर्डातील दुर्गा माता मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याच्या घटनेचा भद्रावती पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. मंदिरासारख्या पवित्र स्थळी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असताना पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीस अटक केली.

पोलीस ठाणे भद्रावती येथे अप.क्र. 425/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 331(4), 305(अ) नुसार गुन्हा दाखल होताच तपासाला वेग देण्यात आला. घटनास्थळी पाहणी, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी शुभम विठ्ठल झाडे (वय 31, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली 4 हजार 100 रूपये रोख रक्कम तसेच दानपेटी फोडण्यासाठी वापरलेली लोखंडी सब्बल (किंमत अंदाजे 250 रूपये ) जप्त करण्यात आली. एकूण 4 हजार 350 रूपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा संतोष बाकल यांचा मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर
,पोलीस हवालदार जगदीश झाडे, पोलीस हवालदार विश्वनाथ चुदरी, पोलीस अंमलदार योगेश घाटोळे, पोलीस अंमलदार संतोष राठोड, पोलीस अंमलदार खुशाल कावडे यांनी केली तर सर्वांनी एकत्रित अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावला.
पुढील तपास पोलीस ठाणे भद्रावती करीत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!